Navi Mumbai APMC Market Scam: एपीएमसी मार्केट शौचालय घोटाळा प्रकरण, माजी संचालक संजय पानसरेंना अटक

APMC Market Toilet Scam: ७ कोटींच्या या शौचालय घोटाळा प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणातील ७ अधिकारी फरार आहेत. संजय पानसरे यांच्यासह ७ अधिकाऱ्यांचा मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
Navi Mumbai APMC Market Scam
Navi Mumbai APMC Market ScamSaam Tv

विनय म्हात्रे, नवी मुंबई

नवी मुंबईतील (Navi Mumbai) कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसी मार्केटमधील (APMC Market) शौचालय घोटाळा प्रकरणी (APMC Market Toilet Scam) नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. या घोटाळा प्रकरणात फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे (Sanjay Pansare) यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. ७ कोटींच्या या शौचालय घोटाळा प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणातील ७ अधिकारी फरार आहेत. संजय पानसरे यांच्यासह ७ अधिकाऱ्यांचा मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

बुधवारी संध्याकाळी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एपीएमसी मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली. तर कांदा बटाटा बाजार समितीचे माजी संचालक अशोक वाळुंज यांची पोलिसांनी चौकशी केली. तर या प्रकरणात अन्य संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणात साताऱ्याचे शरद पवार गटाचे नेते आणि लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन मिळाला आहे.

Navi Mumbai APMC Market Scam
Mumbai Breaking News: हृदयद्रावक! खेळता खेळता कारमध्ये अडकले; सख्ख्या बहीण- भावाचा गुदमरुन मृत्यू

एपीएमसी मार्केट परिसरातील शौचालय चालवण्यासाठी देण्यात येणाऱ्या कंत्राटामध्ये कमी दरामध्ये कंत्राट देत शासनाचे ७ कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करत नवी मुंबईच्या गु्न्हे शाखेने तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन जणांना अटक केली होती. बुधवारी आणखी एकाला म्हणजे संजय पानसरे यांना अटक केली. याप्रकरणात आतापर्यंत ४ जण अटकेत आहेत. तर बुधवारी पोलिसांनी अशोक वाळुंज यांची देखील चौकशी केली. अटक करण्यात आलेले संजय पानसरे हे एपीएमसी मार्केटमधील संचालकांपैकी सर्वात मोठे संचालक आहेत. त्यांच्या अटकेनंतर आता इतर संचालक देखील घाबरले आहेत.

Navi Mumbai APMC Market Scam
Mumbai News: भटक्या कुत्र्यामुळं खुनाच्या घटनेचं रहस्य उलगडलं! धक्कादायक कारण आलं समोर

दरम्यान, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हे आशियातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मार्कट म्हणून ओळखले जाते. एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या शौचालयाच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. शौचालयाच्या कंत्राटामध्ये सरकारचे ७ कोटी ६१ लाख ४९ हजार ६८९ रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह आठ जणांवर आरोप करण्यात आला आहे. २०२३ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नवी मुंबई पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे.

Navi Mumbai APMC Market Scam
Accident News : अपघात घडल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नांत चालकाची पादचारी, दुचाकीस्वारस धडक; दाेन ठार, पाच गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com