Mumbai Breaking News: हृदयद्रावक! खेळता खेळता कारमध्ये अडकले; सख्ख्या बहीण- भावाचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News: . या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गाडीमध्ये श्वास गुदमरल्याने चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Mumbai Breaking News:  हृदयद्रावक! खेळता खेळता कारमध्ये अडकले; सख्ख्या बहिण- भावाचा गुदमरुन मृत्यू
Mumbai Breaking NewsSaamtv
Published On

सचिन गाड, मुंबई|ता. २५ एप्रिल २०२४

मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. अँटॉप हिल परिसरात कारमध्ये अडकून दोघा चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गाडीमध्ये श्वास गुदमरल्याने चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेळता खेळता गाडीत अडकून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अँटॉप हिल परिसरात घडली आहे. साजिद मोहम्मद शेख, (वय ७) आणि मुस्कान शेख (वय,५) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

साजिद शेख आणि मुस्कान हे दोघेही काल दुपारपासून बेपत्ता होते. घरच्यांनी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांचा शोध लागत नव्हता. अखेर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी परिसर पिंजून काढला असता रात्रीच्या सुमारास घरापासून केवळ पन्नास मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका भांगरतील वाहनात दोघ बेशुध्द अवस्थेत सापडले.

Mumbai Breaking News:  हृदयद्रावक! खेळता खेळता कारमध्ये अडकले; सख्ख्या बहिण- भावाचा गुदमरुन मृत्यू
Sambhajinagar News : शेअर मार्केटचे आमिष; दोघांना ३१ लाखांना लावला चुना

मुले खेळता खेळता गाडीमध्ये बसले. गाडी लॉक झाल्यामुळे श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह सायन हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेने चिमुकल्यांच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai Breaking News:  हृदयद्रावक! खेळता खेळता कारमध्ये अडकले; सख्ख्या बहिण- भावाचा गुदमरुन मृत्यू
Nandurbar Lok Sabha : नंदुरबार लोकसभेसाठी २१ अपक्ष उमेदवारी अर्ज; भाजप, काँग्रेस उमेदवारांची वाढणार डोकेदुखी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com