Navi Mumbai Accident News: भरधाव ट्रकची चार जणांना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Accident News: दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी आहेत.
Navi Mumbai Accident News
Navi Mumbai Accident NewsSaam TV
Published On: 

Uran News:

उरणमधील चिरले गावाजवळ गंगा रसोई हॉटेलच्या समोरील सर्विस रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे. सर्विस रोडवरुन जाणाऱ्या ४ इसमांना एका भरधाव ट्रकने उडवल्याची थरारक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून उरण पोलीस अधिक तपास करतायत. (Latest Marathi News)

सदर घटना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. पोलिसांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Navi Mumbai Accident News
Nepal Bus Accident: भाविकांवर काळाचा घाला! नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, ६ भारतीयांसह ७ जणांचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये देखील अपघाताची अशीच एक चित्तथथरारक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास उल्हासनगर काम क्रमांक तीन येथील चोपडा कोर्ट परिसरात शहाड स्टेशन रोडवर हा अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल घसरल्याने मोटरसायकलवरील युवक एका बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला.

या मृत युवकाचे नाव द्रविड मिश्रा असे असून,तो शहाड फाटक परिसरात राहणारा आहे. अपघातानंतर मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या घटनेने शहाड फाटक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याबाबतीत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai Accident News
Ladakh Road Accident: लडाखमध्ये लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले; ९ जवान शहीद, काही जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.