Pune: नऊ वर्षीय ज्ञेय कुलकर्णीचा भीम पराक्रम! 4 वर्षाच्या मुलाचे वाचवले प्राण; राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

पुण्यातील ९ वर्षाच्या ज्ञेय कुलकर्णीने असा पराक्रम केला आहे. ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Dnyey Kulkarni National Bravery Award
Dnyey Kulkarni National Bravery AwardSaamtv
Published On

Pune: आत्ता तुझं खेळण्या बागडण्याच वयं आहे असं आपण लहान मुलांना नेहमीच म्हणत असतो. पण कधी कधी लहान मुलेही असा पराक्रम करुन दाखवतात, ज्याने भल्याभल्यांना तोंडात बोटे घालण्याची वेळ येते. पुण्यातील ९ वर्षाच्या ज्ञेय कुलकर्णीनेही असाच पराक्रम केला आहे. ज्यामुळे त्याला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुण्यातील संस्कृती स्कूल भुकूम कॅम्पस शाळेत शिकणाऱ्या या चिमुकल्याने चार वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवून शौर्याची कामगिरी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बावधन येथे राहणारा ज्ञेय सध्या चौथीत शिकत आहे. त्याने ४ वर्षांच्या लहान मुलाचे प्राण वाचवून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. त्यांच झाल असं की, बिबवेवाडी परिसरातील पर्पल कॅसल सोसायटीमध्ये एक चार वर्षांचा मुलगा आपल्या बहिणीसोबत खेळत होता. ते दोघेही सीसॉवर खेळत होते. (Pune News)

Dnyey Kulkarni National Bravery Award
Pune Crime: धक्कादायक! पैशाचावरुन वाद, डोक्यात रॉड घालून मित्रानेच मित्राला संपवले; पुण्यातील घटना

दरम्यान सीसॉजवळ असलेल्या इलेक्‍ट्रिकच्या खांबातील वीजप्रवाह त्या सीसॉमध्ये आल्यामुळे हा मुलगा त्याला चिकटला. त्या मुलाची बहिण मदतीसाठी आरडाओरडा करत असताना तेथून जात असलेल्या ज्ञेयने प्रसंगावधान राखून त्या मुलाला धक्का देत सीसॉवरून खाली पाडले. त्यामुळे विजेच्या झटक्यातून तो बचावला.

या कामगिरीसाठी ज्ञेयला शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या शूर कामगिरीसाठी ज्ञेयला कौतुकाची थाप मिळत असून इतरांना देखील त्याच्या या कृतीतून प्रेरणा मिळत आहे. दरम्यान हा राष्ट्रीय पुरस्कार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे दिले जाणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रपती, पंतप्रधान आदींच्या उपस्थित पार पडेल.

Dnyey Kulkarni National Bravery Award
Dhule News: उर्फी जावेद, चित्रा वाघ यांच्या वादात आता ‘एमआयएम’ची उडी

याबाबत स्वतः ज्ञेयने सांगितले की, ‘‘आई आणि आजी मला नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याचे सांगतात, त्यामुळे मदत करायला आवडते. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा मी पायात रबरचे स्लीपर घातले होते. त्यामुळे मला विजेचा झटका बसणार नाही हे ही आई व आजीने शिकविले होते म्हणून माहिती होते."

"म्हणून मी धावत त्या मुलाकडे गेलो. त्या मुलाचे प्राण वाचवून मला ही आनंद झाला. यासाठी शाळेत सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, मित्र-मैत्रिणी सगळेच माझे कौतुक करत असल्याने मला अभिमान वाटतो. मदतीचे कार्य असेच सुरू रहावे यासाठी प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा आहे.’’ (Latest Marathi News)

Dnyey Kulkarni National Bravery Award
Jalna Young Farmer Passed Away : दोरी हातातून सुटल्याने युवा शेतक-याचा गेला ताेल, खाेल विहिरीत पडून मृत्यू

आपल्या मुलाने केलेल्या धाडसाचे त्याच्या आईनेही कौतुक केले आहे. याबद्दल बोलताना नंदिनी कुलकर्णी यांनी ‘‘ज्ञेयच्या बाबांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. आपल्या मुलाने इतकी मोठी कामगिरी केल्यावर आई म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो."

"त्याच्या धाडसामुळे एका लहान मुलाचे प्राण वाचू शकले. इतक्या लहान वयात असलेली समझदारी, धाडस खरच कौतुकास्पद आहे. तो एक चांगला व्यक्ती म्हणून घडत असल्यामुळे आता त्याच्या भविष्याची चिंता नाही,"अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार:

कोणतेही कठीण प्रसंग असो किंवा घटनांमध्ये लहान वयातच शूर कामगिरी करणाऱ्या देशातील १६ वर्षाखालील सुमारे २५ मुलांना दरवर्षी ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. हा पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी २५ जानेवारीला दिला जातो. भारत सरकार आणि भारतीय बालकल्याण परिषदेद्वारे (आयसीसीडब्ल्यू) हा पुरस्कार दिला जात असून १९५७ सालापासून या पुरस्काराला सुरवात झाली. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असा या पुरस्काराचा स्वरूप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com