धुळे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या उर्फी जावेद (Urfi Javed) व भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू आहे. या वादात आता धुळ्यातील (Dhule News) एमआयएमच्या महिला पदाधिकारि दीपा नेक यांनी उडी घेत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. (Live Marathi News)
धुळ्यातील एमआयएम पक्षाच्या महिला पदाधिकारी दीपा नेक यांनी उर्फी जावेद व भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या दोघांवर देखील निशाणा साधला. आपण भारत देशात राहतो. या ठिकाणी कुणाला कुठले कपडे घालावेत याचे व्यक्ती स्वातंत्र्य असले; तरी कपडे घालताना भारतीय संस्कृतीचा विचार करावा. असे म्हणत उरफी जावेद हिची देखील कान टोचनी केली.
महिला अत्याचार मिटविण्यावर अधिक काम हवे
तसेच भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील हा वाद अधिक न वाढवता राज्यामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अन्याय अत्याचारावर अधिक काम करण्याची गरज असल्याचे म्हणत चित्रा वाघ यांना देखील या वादावर पडदा टाकण्यासंदर्भात भाष्य केले आहे. त्याचबरोबर महिलांनीच आपापसात लढून महिलांचे विषय भरकटले जातील; अशी परिस्थिती निर्माण करू नये. असे म्हणत हा वाद मिटवण्याबाबत दोघांना देखील कान टोचण्या दिल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.