Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकरांनो पाणी साठवून ठेवा, 'या' भागांमध्ये १२ तासांसाठी पाणीकपात; कारण काय?

Navi Mumbai Water Supply News: नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी नवी मुंबईच्या काही विभागात पाणीकपात करण्यात येणार आहे.
Municipal Corporation announces 12 hour water cut in Navi Mumbai CBD Belapur Vashi and more area
Municipal Corporation announces 12 hour water cut in Navi Mumbai CBD Belapur Vashi and more areaSaam TV
Published On

Navi Mumbai Water Supply News: नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी नवी मुंबईच्या काही विभागात पाणीकपात करण्यात येणार आहे. तब्बल १२ तास ही पाणीकपात करण्यात येणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने मोरबे धरण आणि दिघा दरम्यानच्या मुख्य पुरवठा करणाऱ्या पाइपलाईनच्या दुरुस्ती आणि देखभालीचे कामे हाती घेतली आहे. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

Municipal Corporation announces 12 hour water cut in Navi Mumbai CBD Belapur Vashi and more area
Pune Water Supply: पुणेकरांना मोठा दिलासा! गुरुवारचा ‘पाणी बंद’चा निर्णय अखेर मागे

पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं तसंच साठवून ठेवावं, असं आवाहन नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी, कौपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या परिसरात पाणी कपात करण्यात येणार आहे. तब्बल १२ तास या भागात पाणीपुरवठा होणार नाहीये. मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

Municipal Corporation announces 12 hour water cut in Navi Mumbai CBD Belapur Vashi and more area
Pune Water Supply: पुणेकरांना मोठा दिलासा! गुरुवारचा ‘पाणी बंद’चा निर्णय अखेर मागे

बुधवारी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशीही माहिती समोर येत आहे. पाणीकपात करण्यात आलेल्या भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि शटडाऊन दरम्यान महामंडळाला सहकार्य करावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे.

दरम्यान, नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण यंदाच्या पावसात ९१ टक्के भरले आहे. धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर आणखी ५०० मिलीमीटर पाऊस पडल्याने धरण १० टक्के भरणार आहे. मोरबे धरणाची पातळी ८८ मीटरपर्यंत पोहोचल्यानंतर १०० टक्के भरते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com