Mumbai News: मुंबईचा उमेश गुप्ता ठरला 'धर्मवीर श्री २०२४' चा मानकरी, शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकवला किताब

Mumbai News Update: मुंबईचा उमेश गुप्ता यावर्षीचा 'धर्मवीर श्री २०२४' मानकरी ठरला आहे. वाड्यातील पी. जे. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने अव्वल स्थान मिळवून हा किताब पटकावला आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam Digital
Published On

Mumbai News

मुंबईचा उमेश गुप्ता यावर्षीचा 'धर्मवीर श्री २०२४' मानकरी ठरला आहे. वाड्यातील पी. जे. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने अव्वल स्थान मिळवून हा किताब पटकावला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अंगीकृत चर्मोद्योग कामगार सेना व भारतीय माथाडी आणि जनरल कामगार सेना, पालघर डिस्ट्रिक्ट / वेस्टर्न ठाणे बॉडी बिल्डर्स ॲंड फिटनेस असोसिएशन, संत रोहिदास शैक्षणिक, सामाजिक क्रीडा संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने 'धर्मवीर श्री २०२४ शरीरसौष्ठव स्पर्धेचे' आयोजन शुक्रवार (दि. २) येथील पी. जे. हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते.

मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील साधारण १०० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. तरुणांना आरोग्याचे व फिटनेसचे महत्त्व समजावे व त्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने गेली १८ वर्षांपासून आम्ही या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करीत असून दरवर्षी या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया चर्मोद्योग कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष व स्पर्धेचे आयोजक भरत गायकवाड यांनी दिली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai News
Ajit Pawar: पुण्यात आतंरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारणार; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष मयूर कांबळे, माजी आमदार रूपेश म्हात्रे,काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, जि.प.पालघरचे माजी उपाध्यक्ष निलेश गंधे, ठाणे जिल्हा मध्यवर्त बँकेचे संचालक निलेश भोईर, वाडा पंचायत समितीच्या सभापती अस्मिता लहांगे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख उमेश पठारे,गीतांजली कोलेकर आदींसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mumbai News
Family Planning: कुटुंब नियोजनात या तालुक्यातील महिला आघाडीवर, पुरुषांचं प्रमाण का कमी? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com