Ajit Pawar: पुण्यात आतंरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारणार; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

Ajit Pawar on New aiport: आणखी एक राज्याच्या विकासात भर घालणार वृत्त हाती आलं आहे. पुण्यात चांगलं आंतराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभारणार, याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
Ajit pawar
Ajit pawar Saam tv
Published On

Ajit Pawar News:

ठाणे आणि बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला परवानगी मिळाली असताना, त्यानंतर आणखी एक राज्याच्या विकासात भर घालणारं वृत्त हाती आलं आहे. पुण्यात चांगलं आंतराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभारणार, याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील सभेत अजित पवार म्हणाले, ' बारामतीमध्ये आधी मुली द्यायला घाबरायचे. मात्र आता बारामतीचा झालेला विकास पाहिला तर आपल्या बारामतीमधील मुलांना मुली कमी पडणार नाहीत. मागच्या सरकारच्या काळात 5 विमानतळे मंजूर झालेली आहेत'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ajit pawar
Pandharpur Corridor: पंढरपूर काॅरीडाॅरच्या आराखड्याचे काम सुरू, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

'वरिष्ठांनी मधल्या काळात वेगळी भूमिका घेतली. आम्ही त्याला पाठिंबा दिला. मात्र, आता मी भूमिका घेतली आहे. काही ठिकाणी लोक चुकीची कामे करतात. यातून त्यांना काय मिळतं हे माहीत नाही. महाराष्ट्रात बारामती हे विकासाचे रोल मॉडेल म्हणून ओळखले जाते आणि यामुळे माझी ओळख आहे, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री झाल्यावर लोकांनी स्वागत केलं : अजित पवार

'मी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालो. त्यावेळी लोक माझं एवढं मोठ्या प्रमाणात स्वागत करतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरे यांच्या कालावधीत जे काही काम केलं, यामध्ये उद्धव ठाकरेंनी देखील मला काम करण्याची मुभा दिली, असेही त्यांनी सांगितले.

'मी जेव्हा वेगळी भूमिका घेतली, त्यावेळी कोणीही माझ्यावर एक अक्षर देखील बोललं नाही. मी भूमिका घेतली तेव्हा सगळ्या आमदारांच्या सह्यांचे पत्र माझ्याकडे होतं. इतर शिल्लक आमदार देखील माझ्याकडे येणार होते, असा दावा अजित पवारांनी यावेळी केला.

Ajit pawar
Nandurbar News: नंदुरबारमध्ये काँग्रेसला धक्का; जिल्हा परिषद सभापती रतन पाडवींचा अजित पवार गटात प्रवेश

आम्ही आमची विचारधारा सोडली नाही : अजित पवार

'मी आतापर्यंत अनेक पंतप्रधानांचं नेतृत्व पाहिलं. आम्ही देखील सुरुवातीच्या काळात त्यांना विरोध केला. आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. माझा एक स्वभाव आहे तो बदलला पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करतो आहे. माझ्या जवळपास फिरणारा जर चुकीचा वागला. तर मी त्यांना वाचवा म्हणून सांगणार नाही. त्यांच्यावर पांघरून घालणार नाही, असेही अजित पवारांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com