Family Planning
Family PlanningSaam Digital

Family Planning: कुटुंब नियोजनात या तालुक्यातील महिला आघाडीवर, पुरुषांचं प्रमाण का कमी? जाणून घ्या

Family Planning News: शिक्षण, आरोग्य विभाग तथा केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे तालुक्याचा विकास होत आहे. ‘लहान कुटुंब, सुखी कुटुंब’ या ब्रीद वाक्याचा बोध घेत येथील नागरिकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला प्राधान्य दिले आहे.
Published on

Family Planning

शिक्षण, आरोग्य विभाग तथा केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे तालुक्याचा विकास होत आहे. ‘लहान कुटुंब, सुखी कुटुंब’ या ब्रीद वाक्याचा बोध घेत येथील जव्हार तालुक्यातील नागरिकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला प्राधान्य दिले आहे. गेल्या वर्षभरात शस्त्रक्रियेचे एकूण उद्दिष्ट ४८५ होते. मात्र तालुका आरोग्य विभागाने ते सहज पूर्ण करून त्यापेक्षा अधिक म्हणजे ५४० शस्त्रक्रिया केल्या आहेत. ग्रामीण भागातदेखील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी नागरिक पुढाकार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते. त्यामुळेच आरोग्य विभागाकडून ‘हम दो, हमारे दो’चा जागर करत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जाते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने कुठलेही विपरीत परिणाम पुरुषाच्या शरीरावर होत नसल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. शिवाय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया वैवाहिक जीवनाचा आनंद घेणाऱ्या पुरुष किंवा महिलेला करता येते. मात्र मागील वर्षभरात पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला पाठ फिरवली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया फायद्याची असली, तरी समाजात अनेक गैरसमज कायम आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जातात. नसबंदी केल्याने पौरुषत्व जाण्याच्या भीतीने पुरुष मंडळी शस्त्रक्रियेला तयार होत नाही. ज्यामुळे महिलांनाच शस्त्रक्रियेसाठी पुढे जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

Family Planning
Body Needs 11kg Meat: शरीराला वर्षाला ११ किलो मांस गरजेचं, आपण किती खातो, आपल्याला योग्य प्रोटीन मिळतं का?

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमुळे पुरुषाच्या शरीरावर कुठलेही विपरीत परिणाम होत नाही. याबाबत नेहमीच जनजागृती करण्यात येते. मात्र असे असले तरी मागील वर्षभरात पुरुषांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला पाठ दाखवली आहे. पुरुषांनी न घाबरता कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुढे येण्याची गरज आहे.

पुरुषांचे प्रमाण अद्याप कमीच

गेल्या वर्षभरात स्त्री शस्त्रक्रिया ५२१ करण्यात आल्या आहेत, मात्र त्या तुलनेत पुरुष शस्त्रक्रियांचे प्रमाण १९ असल्याने त्यांच्या सहभागाचे अल्प प्रमाण आहे. यावरून कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत महिलाच पुढे असल्याचे दिसून येते. या शस्त्रक्रियेसाठी पुरुषांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र ग्रामीण भागात पुरुषदेखील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी हळूहळू का होईना, पुढाकार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

Family Planning
Viral Video: चक्क कैद्यांनी दिला पोलिसांच्या बंद पडलेल्या वाहनाला धक्का, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com