शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटिनचा पुरवठा आवश्यक आहे. मांसाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे डॉक्टर आहारात मांसाहार वाढवण्याचा सल्ला देतात. दरम्यान राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०२२ नुसार देशात ७२ टक्के लोकसंख्या मांसाहारी असल्याची बाब समोर आली आहे. परंतु शरीराला आवश्यक तितक्या प्रोटिनचा पुरवठा व्हावा याकरिता प्रति व्यक्ती, प्रति वर्ष ११ किलो मांस खाणं गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्रात हे प्रमाण अवघे ९.६ किलो असून, देशाची सरासरी केवळ ७ टक्के असल्याची माहिती राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. बारबुद्धे यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.
देशात सरासरी प्रति व्यक्ती मांस सेवनाचं प्रमाण ७.१ किलो आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणात ते दुप्पट म्हणजे २८, तर महाराष्ट्रात हे प्रमाण अवघे ९.६ किलो आहे. मांसावर प्रक्रियेचा अभाव असल्याने महाराष्ट्रात पशुपालकांना त्यांच्या जनावरांचा योग्य दर मिळत नाही. त्यामुळेच चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, आदिलाबाद या भागांतून रोज २० ते २५ ट्रक शेळ्या हैदराबादला विक्रीसाठी येतात. मांस संशोधन संस्थेने मटण, चिकन लोणचे यासह मांसापासून २५ ते २६ प्रक्रियाजन्य पदार्थ विकसित केले आहेत. हैदराबाद हलीम हे या भागात प्रसिद्ध आहे. ईदच्या काळात याला मोठी मागणी राहते. सहा ते सात तास कढईत मटण शिजवले जाते.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यानंतर ते गळते यात मग काजू, बदाम व इतर घटक टाकतात. याचे सेवन केल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. हैदराबाद हलीम हे युनीक असल्याने त्याला भौगोलिक मानांकनही काहींनी मिळवले आहे. हलीमपासूनच हलीम बॉल्स तयार करण्यात आले आहेत. यात प्रक्रिया करून हलीम वाळविले जाते व वर्षभर कधीही खाता येते.
भारताचा मांस बाजार मोठा आहे. भारतातून दरवर्षी सरासरी ३२ हजार कोटींचे मांस व प्रक्रियाजन्य पदार्थाची निर्यात होते. त्यामध्ये २५ हजार कोटी रुपयांचे म्हशींचे मांस आहे. त्यानंतर शेळी, मेंढी या श्रेणीतील मांसाचा समावेश होतो. भारतातील काही राज्यांमध्ये वराहाच्या मांसाला मागणी आहे. देशात मांस व्यवसाय अस्वच्छ क्षेत्रात होत असल्याने मांस सेवन करण्यासाठी अनेक जण नाक मुरडतात. मांस व्यवसायाचा परिसर स्वच्छ असावा याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.