मुंबई: शिवसेना पक्षाचं मुख्यालय (Shivsena Head Quarter) म्हणजेच शिवसेना भवन (Shivsena Bhavan) हे आता मुंबईत (Mumbai) नसून इटलीत (Italy) असल्याचं जागतिक ज्ञानकोश म्हणजेच विकीपिडियाने (Wikipedia) सांगितलं आहे. याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र ही बातमी पुर्णतः खोटी (Fake News) असून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने हा खोडसाळपणा केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ही चुक सुधारली असून विकीपिडीयावर शिवसेना भवनाचा पत्ता आता बरोबर दाखवत आहे. मात्र हा खोडसाळपणा कुणी केला याबद्दलचा तपास आता मुंबई पोलिस (Mumbai Police) करणार आहेत. (Mumbai's Shiv Sena Bhavan now in Italy? Read exactly what happened)
हे देखील पहा -
प्रसिद्ध जागतिक ज्ञानकोशावर म्हणजेच विकीपिडीयावर आज कुणीतरी खोडसाळपणे शिवसेना भवनाचा पत्ता हा मुंबईच्या दादर (Dadar) ऐवजी इटली या देशात असल्याची खोटी माहिती शिवसेनेच्या विकीपिडिया पेजवर टाकली आणि त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल केले. जवळपास सहा तासांपुर्वीच कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचं दिसत आहे. मात्र ती व्यक्ती नक्की कोण हे अजून कळू शकलेलं नाही. राज्यात भाजपच्या (BJP) जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad Yatra) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचे मुख्यमंत्र्याबाबतचे (CM Uddhav Thackeray) ते आक्षेपार्ह विधान आणि मग त्यांचे अटकसत्र यांमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच गुंतली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे एकमेकांवर चिखलफेक करतायत. रस्त्यावर असो की, सोशल मीडियावर असो दोन्हीकडे शिवसेना-भाजप एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही.
शिवसेनेने भाजपशी असलेली पारंपारिक युती तोडुन कॉंग्रेस (Congress) आणि राष्टवादीसोबत (NCP) मिळून सरकार बनवल्याने भाजपला जास्त जागा मिळूनही विरोधी पक्षात बसावे लागले त्यामुळे भाजपचा शिवसेनेवर राग आहे. शिवाय कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या मुळच्या इटली (Italy) या देशातल्या आहेत. त्यामुळेच विकीपिडीयावर कुणीतरी मुद्दाम हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.