

Summary -
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी टॉय ट्रेन लवकरच मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे
चार वर्षांनंतर नव्या रुपात ही टॉय ट्रेन पर्यटकांसाठी पुन्हा सुरू होणार आहे
नवीन ट्रेनमध्ये काचेचं छत, मोठ्या खिडक्या, व्हिस्टाडोम कोच आणि मेट्रोसारखी सुविधा देण्यात आली आहे
नवीन कृष्णगिरी स्टेशन फुलपाखराच्या आकारात बांधण्यात आले आहे
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईच्या बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच वनराणी मिनी ट्राय ट्रेनचा डबल धमाका पर्यटकांना अनुभवता येणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश आले असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा एकदा धावणार आहे.
या टॉय ट्रेनची चाचणी सुरू आहे. विंटेज मिनी ट्राय ट्रेन आणि नवीन व्हिस्टाडोम टॉय ट्रेनची चाचणी सुरू असून पारदर्शक छत आणि मोठ्या खिडक्यांसह आकर्षक सफर लवकरच मुंबईकर पर्यटकांना अनुभवता येणार आहे. ४ वर्षांनंतर पुन्हा टॉय ट्रेन सुरू होणार असल्यामुळे सर्वांसाठी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. वनराणी टॉय ट्रेन लहानग्यांसह पर्यटकांना देखील मोहित करणार असल्याचे बोलले जात आहे.
वनराणी टॉय ट्रेनचे रुपडं बदलण्यात आले आहे. या टॉय ट्रेनेच पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले. काचेचे छत, मोठ्या काचेच्या खिडक्या आणि मेट्रोप्रमाणे बसण्याची व्यवस्था या टॉय ट्रेनमध्ये करण्यात आली आहे. या टॉय ट्रेनमधून जंगल सफारी करताना प्रवाशांना ३६० अंश नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेता येईल. या ट्रेनध्ये वन्यजीवांची चित्र काढण्यात आली आहेत. त्यामुळे लहान मुलांसाठी जास्तच आकर्षक ठरेल.
१९७४ मध्ये संजय गाधी राष्ट्रीय उद्यानात सुरू झालेली ही वनराणी टॉय ट्रेन २०२१ मध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बंद करण्यात आली होती. पण आता ४ वर्षांनंतर नव्या रुपात ही ट्रेन पर्यटकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ही नवी टॉय ट्रेन पर्यावरणपूरक बनवण्यात आली आहे. त्यात चार विस्टाडोम कोच असतील. यात प्रत्येकी ८० प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. लवकरच दुसरी ट्रेन पर्यटकांच्या भेटीला येईल ही ट्रेन खुल्या डब्यासह असेल.
नव्या वनराणी टॉय ट्रेनसाठी आता २.३ किलोमीटर लांब रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आला आहे. तो ५.५ चौरस किलोमीटरच्या कृष्णगिरी पार्कमधून सुरू होईल. ज्यामध्ये जैवविविधता क्षेत्र, एक मिनी प्राणी संग्रहालय, बोगदे आणि पूल यांचा समावेश असणार आहे. या ट्रॅकवर १५ पूल बांधण्यात आले आहेत. कृष्णगिरी स्टेशनची निर्मिती फुलपाखराच्या आकाराची करण्यात आली आहे. जी खूपच आकर्षक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.