Shreya Maskar
अंबागड किल्ला भंडारा जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि डोंगररांगांमध्ये वसलेला आहे. हा किल्ला तुमसर तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेत आहे.
उंच दगडी भिंती, मजबूत बुरुज अशी संरक्षणात्मक रचना येथे पाहायला मिळते. अंबागड किल्ला शत्रूंपासून संरक्षणासाठी महत्त्वाचा होता.
बागड किल्ल्याच्या भोवती खोल खंदक आहे, जो शत्रूंपासून संरक्षणासाठी बांधला होता. इतिहासातील ही महत्त्वाची वास्तू आहे.
अंबागड किल्ला शौर्याचे प्रतीक आहे. अंबागड किल्ल्यावरून भंडारा जिल्ह्याचे सुंदर आणि मनमोहक दृश्य दिसते.
अंबागड किल्ला मध्ययुगीन लष्करी स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे, जो प्राचीन वास्तुकलेमुळे ओळखला जातो.
अंबागड किल्ल्यावर छोटा ट्रेकिंगचा प्लान करू शकता. अंदाजे ३० मिनिटांत किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे येथे मित्रांसोबत आवर्जून जा.
डारा जिल्ह्यातून रिक्षाने किंवा टॅक्सीने अंबागड किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता. हिवाळ्यात येथे आवर्जून भेट द्या. दिवाळीच्या सुट्टीत येथे जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.