Shreya Maskar
दिवाळीच्या सुट्टीत लांब कशाला? पुण्याजवळील एका भन्नाट लोकेशनला भेट द्या. येथे तुम्हाला तुफान मजा मस्ती करायला मिळेल.
महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचा असेल पुण्याजवळील लवासा बेस्ट ठिकाण आहे.
लवासा हे पुण्याजवळ असलेले एक हिल स्टेशन आहे. हे पश्चिम घाटात वसलेले शहर आहे.
लवासा हे पुण्याजवळचे भारतातील पहिले खासगी हिल स्टेशन आहे. ही युरोपियन शैलीतील शहर रचना आहे.
लवासाला गेल्यावर नेचर ट्रेल आणि टेमघर धरण आवर्जून पाहा. टेमघर धरण हे मुठा नदीवरील एक सुंदर ठिकाण आहे.
लवासा नेचर ट्रेल येथे हिरवीगार निसर्ग पाहायला मिळते. तसेच लवासाला तुम्ही बोटिंग करू शकता.
लवासा हे महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले असून येथे तुम्ही प्रत्येक ठिकाणी सुंदर फोटोशूट करू शकता.
मुंबई आणि पुण्याहून लवासाला जायचे असेल तर बाय रोड हाच सर्वोत्तम पर्याय आहे. कुटुंबासोबत मजा-मस्ती करत लवासा फिरा.