Shreya Maskar
कोकणाला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. देवगडजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिठमुंबरी बीच वसलेला आहे.
मिठमुंबरी बीच शांत, सुंदर आणि स्वच्छ किनारा आहे. येथे आजूबाजूला सुंदर हिरवीगार वनराई पाहायला मिळते.
मिठमुंबरी बीचच्या आसपास रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि उत्कृष्ट खाण्यापिण्याची सोय उपलब्ध आहे.
मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्याजवळ पवनचक्की देखील पाहायला मिळते. या पवनचक्क्या टेकड्यांवर स्थित आहेत.
समुद्र किनाऱ्यावर लहान मुलं वाळूत क्रिकेट, फुटबॉल खेळताना दिसतात. तसेच छोटी मुलं वाळूचे किल्ले बनवतात.
मिठमुंबरी बीचवर सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
मिठमुंबरी बीच येथून तुम्ही कुणकेश्वर मंदिरापर्यंत पोहचू शकता. कुणकेश्वर हे प्रसिद्ध भगवान शंकराचे मंदिर आहे.
मुंबईहून देवगडला बसने, रेल्वेने जा. पुढे देवगडवरून तुम्ही रिक्षाने मिठमुंबरी बीचला पोहचू शकता.