Shreya Maskar
आचरा बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे. येथे हिवाळ्यात थंडगार वातावरण अनुभवता येते. त्यामुळे सुट्टीत कोकणात ट्रिप प्लान करा.
आचरा बीचच्या एका बाजूला टेकडी आहे. ज्याला आचरा पॉईंट दीपगृह असे म्हटले जाते. दुसऱ्या बाजूला अरबी समुद्राचा शांत किनारा आहे.
आचरा बीचजवळ भगवती देवीचे मंदिर आहे. त्यामुळे येथे मंगलमय वातावरण अनुभवता येते. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
आचरा बीचजवळ धामापूर तलावाकाठी श्री भगवती देवीचे मंदिर आहे. हे मंदिर १६ व्या शतकात बांधले गेले आहे.
आचरा बीचच्या जवळ धामापूर तलाव आहे. हे शांत आणि कमी गर्दीचे ठिकाण आहे. संध्याकाळी येथे स्थानिक लोक फेरफटका मारायला येतात.
आचरा बीच पोहण्यासाठी आणि डॉल्फिन पाहण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. परदेशी पर्यटक येथे आवर्जून येतात.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आचरा बीचला आवर्जून भेट द्या. कुटुंब, जोडीदार आणि मित्रमंडळींसोबत फिरायला उत्तम ठिकाण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.