
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा कारण शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी शहरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही परिसरातील पाणी पुरवठा बंद असणार आहे. या भागात सकाळी सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Latest News)
बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून के/पूर्व विभागामध्ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) चे काम सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान करण्यात येणार आहे. या कामांमुळे ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद असेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जलवाहिनी जोडण्याचे काम
के पूर्व विभागातील महाकाली गुंफा मार्गावरील रम्य जीवन हाऊसिंग सोसायटी जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग, बी. डी. सावंत मार्ग चौक,अंधेरी (पूर्व) येथे नवीन १ हजार ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि तसेच १ हजार २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी (वर्सोवा आऊटलेट) जोडण्याचे काम केले जाणार आहे.
त्याचबरोबर वेरावली जलाशय १ व २ चे संरचनाचे काम करण्यात येणार आहे. हे काम ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान केले जाणार आहे. त्यामुळे के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागात सुमारे १५ तास के पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित परिसरातील नागरिकांनी या कामाच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. त्याचबरोबर पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या भागात असेल पाणीपुरवठा बंद
के पूर्व विभाग - त्रिपाठी नगर, मुंशी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व), सारीपुत नगर, दुर्गा नगर,जोगेश्वरी (पूर्व), दत्त टेकडी, ओबेरॉय स्प्लेंडर, केल्टी पाडा, गणेश मंदीर (जे.व्ही.एल.आर.) जवळचा परिसर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, बांद्रा प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल वसाहत, शंकरवाडी, मेघवाडी, पंप हाउस, विजय राउत रस्ता , पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, सर्वोदय नगर, कोकण नगर, विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग
साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान मार्ग , श्रद्धानंद मार्ग , नेहरू मार्ग , तेजपाल मार्ग , शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विले-पार्ले पूर्व , अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, भगत सिंग व चरत सिंग वसाहत, अंधेरी पूर्व, जुना नागरदास मार्ग , मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग , पारसी पंचायत मार्ग , आर. के. सिंग रस्ता , निकोलसवाडी परिसर.
के पश्चिम विभाग - जोगेश्वरी स्थानक मार्ग, एस.व्ही. मार्ग, साब्री मशीद ते जेव्हीएलआर जंक्शन, मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व), यादव नगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्थानक मार्ग , सहकार मार्ग , बांदिवली हिल . पी दक्षिण - राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद) आणि बिंबीसारनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)
पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने काही भागातील पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्यात आलीय. के पश्चिम विभागाच्या एस व्ही मार्ग, व्ही. पी मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्थानक मार्ग या परिसरात सध्या दररोज पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० या वेळेत पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात १ नोव्हेंबर २०२३ पासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.५० या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.