Mumbai Water Shortage: मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट; मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांत किती साठा?

Mumbai Water Shortage News: मुंबईकरांना येत्या काही दिवसांत पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार असल्याचे दिसत आहे.
Mumbai Water Shortage
Mumbai Water ShortageSaam TV

मुंबईकरांना येत्या काही दिवसांत पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होणार असल्याचे दिसत आहे.

मुंबईला पाठीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाठीसाठा कमी झाला आहे. सात धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळेच पुढच्या महिन्यात पाणी कपात होऊ शकते. मुंबईतील पाणीसाठा अडीच लाख दक्षलक्ष आहे. तरीही पावसावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे प्रशासन पाणीकपातीचा निर्णय घेऊ शकतात.

रिपोर्टनुसार, प्रशासन येत्या दोन दिवसात मुंबईतील पाणीसाठ्याचा आढावा घेणार आहे. त्यात पाणीकपातीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणात फक्त १०.६७ टक्के पाणी साठा आहे. या सातही धरणांचा एकत्र मिळून १ लाख ५४ हजार ४७१ दक्षलक्ष लिटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात हाच पाणीसाठा १६.४३ टक्के होता. हा आकडा आता कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

१ टक्का पाणीसाठा हा मुंबईकरांना तीन दिवस पाणीपुरवठ्याची मागणी पुरवणी करतो. याच अनुषगांमने महिन्याला १२ ते १३ टक्के पाणीपुरवठा होतो. मात्र, हाच आकडा आता कमी झाला आहे.

Mumbai Water Shortage
Shirur News : दुर्देवी घटना! मामाच्या गावी आलेल्या भावंडांवर काळाची झडप; शेततळ्यात बुडून सख्या भावांचा मृत्यू

पाणीकपात होण्याची कारणे

सध्या उन्हाळा खूप वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. याचसोबत उन्हामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ होते. याचा परिणाम पाणीसाठ्यावर होतो. तसेच जून महिन्यात आवश्यक तितका पाऊस पडत नाही. त्यामुळेच हा पाणीसाठी जुलै महिन्यापर्यंत पुरवावा लागणार आहे. यंदा पाऊस वेळेवर पडला तरच पाणीकपातीचे संकट दूर होऊ शकते.

Mumbai Water Shortage
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com