Mumbai Weather : मुंबई रात्रीही घामाघूम; मुंबईकरांना बसताहेत दिवसरात्र उष्णतेच्या झळा, कारण काय?

Mumbai Weather update : आता मुंबईकरांना घामाघुम करणारी बातमी....मुंबईत दिवसरात्र उष्णतेच्या झळा बसतायेत. तापमान वाढीचा परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. पाहूया एक रिपोर्ट
Mumbai Weather
Mumbai Weather update Google
Published On

मे महिना अजून दूर आहे. मात्र . महाराष्ट्रात कधी नव्हे ते आता फेब्रुवारीतच रात्रीचे तापमान वाढत आहे. थकलेल्या मानवी शरीराला रात्रीचा शीतल गारवा काहीसा आराम देत असतो. मात्र रात्रीचेही तापमान वाढू लागल्याने नागरिक बैचेन झालेत. उष्ण दिवस आणि तेवढीच रात्रीची उष्णता यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.

Mumbai Weather
Climate Change : वातावरणात सतत बदल; पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, आंब्याचा मोहोरही गळला

युरोपीय युनियनच्या ताज्या अहवालानुसार पृथ्वी एक लाख वर्षात नव्हती एवढी उष्ण बनली आहे. भारतात सलग तिसऱ्या वर्षी तीव्र उष्ण लाट निर्माण झाली होती. अनेक शहरांमधील रात्रीचे तापमानही ३० अंशाच्या वर गेले होते. भविष्यात सगळ्यात जास्त धोका असले तो मुंबईला. शहर नियोजनाबाबत जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबईकरांचा श्वास कोंडेल अशी भीती व्यक्त होतेय.

Mumbai Weather
Climate Change : ढगाळ वातावरणाचा खरबूज, मोसंबीवर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादक शेतकरी अडचणीत

वाढत्या तापमानात नगर नियोजन महत्वाचं,असं पर्यावरण तज्ज्ञ सुनीता नारायण म्हणाले. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीचा अभ्यास विज्ञान व पर्यावरण केंद्राने केला. त्यानुसार देशातील 17 राज्यांनी एक मार्च ते पंचवीस जून 2024 या काळात उष्ण रात्री अनुभवल्या. छत्तीसगड, गुजरात , मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मार्चमध्येत उष्णतेची रात्र सुरु झाली. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे दिवसांपेक्षाही रात्रीचे तापमान अधिक वेगाने वाढू लागले आहे.

Mumbai Weather
Climate Change : तापमान वाढीचा फळबागांना फटका; कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

या तापमान वाढीचा परिणाम थेट आता लोकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. कार्यक्षमता कमी होण्याबरोबरच विविध विकारही डोकं वर काढतील. मुंबईतील लोकसंख्येची घनता, फसलेले शहर नियोजन , नाहीसा होत असलेला हरित पट्टा आण हवेतील आद्रतेमुळे या वाढत्या तापमानाचा परिणाम मुंबईकरांना अधिक सहन करावा लागेल यामुळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com