Mumbai Pune: मुंबई-पुणे प्रवास दीड तासानं होणार कमी, मार्ग आणि प्लान काय?

Mumbai Pune Travel Time Cut By 90 Minutes: मुंबईकर आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबई पुण्याचा प्रवास २ तासातच होणार आहे.
Mumbai Pune
Mumbai PuneSaam Tv
Published On

मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून पुण्याला जाणे अधिक सोपे आणि वेगाने होणार आहे. मुंबईहून पुण्याला जाताना आता ९० मिनिटे वाचणार आहे. आता मुंबई पुणे प्रवास अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे. आता अटल सेतूला जोडला जाणारा एक महामार्ग तयार करण्यात येणार आहे. हा महामार्ग थेट सातारा आणि सांगलीला जोडला जाणार आहे.

अटल सेतूला जोडल्या जाणाऱ्या महामार्गामुळे मुंबई पुणे प्रवास आता दीड तासाने कमी होणार आहे. सध्या मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. याच प्रवासाचा कालावधी दीड ते २ तासांनी कमी होणार आहे. सोलापूर आणि साताऱ्याला जोडल्या जाणाऱ्या एक्सप्रेस वेमुळे हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. (Mumbai Pune New ExpressWay)

Mumbai Pune
Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी टेन्शन वाढवलं, आर्थर रोड तुरुंगात टोळी युद्धाची भीती

आता मुंबई पुणे हा प्रवास फक्त दोन तासातच होणार आहे. सध्या २ ते ४ तासात आपण पुण्याला जातो. त्यात अनेकदा वाहतूक कोडींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच हा नवीन एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. आठ लेन असलेल्या या महामार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासाची ७५ ते ९० मिनिटे कमी होणार आहे.

हा एक्सप्रेस वे महत्त्वाच्या मार्गांना जोडला जाणार आहे. यात अटल सेतू (Atal Setu), जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, पुणे, सोलापूर, साताऱ्याचा समावेश आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

Mumbai Pune
Khopoli Accident : भल्या पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, खासगी बस ट्रकला धडकली, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

मुंबई पुणे कोरिडॉरमधील वाढत्या रहदारीमुळे नागरिकांना वाहतूक कोडींचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने हा नवीन एक्सप्रेस वे बांधण्यात येणार आहे. नवीन एक्सप्रेस वे, अटल सेतू थेट सोलापूर आणि साताऱ्याला जोडणार आहे. (Mumbai Pune Travel Time Cut By 90 Minutes)

Mumbai Pune
Mumbai local update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com