Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; 9 जण जखमी

Car accident News: मुंबई-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर हद्दीत कारचा भीषण अपघात झाला आहे.
Mumbai-Pune Highway Car accident
Mumbai-Pune Highway Car accidentSaaam Tv

Mumbai-Pune Highway:

>> सचिन कदम

मुंबई-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर हद्दीत कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. संदीप दिलीप बर्वे (वय 48 वर्षे) असं मृत कार चालकाचे नाव आहे. ते डोंबिवली येथील रहिवासी आहेत. त्यांचे शव पुढील कार्यवाहीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर येथे लोकमान्या रुग्णालयात घेऊन पाठवण्यात आलं आहे.

या अपघातात एक महिलेसह 9 जण जखमी झाले आहेत. यात एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. या अपघात सुमन बर्वे (वय 68 वर्ष) यांना गंबीर दुखापत झाली आहे, असं सांगण्यात येत आहेत.

Mumbai-Pune Highway Car accident
Sharad Pawar: रायगडमध्ये शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, पुढील प्रवासासाठी रस्ते मार्गे रवाना

त्यांच्या व्यतिरिक्त अश्वजीत बर्वे वय 13 वर्ष, प्रणव बर्वे वय 5 वर्ष, आदेश बर्वे (वय 3 वर्ष), अनिकेत बर्वे (वय 19 वर्ष), प्रिया बर्वे (वय 18 वर्ष), गौरव बर्वे (वय 17 वर्ष), कियारा बर्वे (वय 6 महिने) यांना किरकोळ स्वरूपाचा दुखापती झालेल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी वाहनाने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे रवाना करण्यात आलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा कावरील नियंत्रण सुटल्याने डाव्या बाजुची रेलिंग तोडून कार रस्त्याच्या खाली पलटली. ज्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Mumbai-Pune Highway Car accident
Yamini Jadhav: दक्षिण मुंबईत शिंदे गटाचा उमेदवार ठरला! अरविंद सावंतांच्या विरोधात यामिनी जाधव यांना दिलं तिकीट

दरम्यान, अपघातातील वाहन रस्त्याच्या खाली असल्याने वाहतूक सुरळीत सुरु आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस, देवदुत टीम, आयआरबी कडील स्टाफ, अपघातग्रस्त मदत टीम इतर वाहन चालक उपस्थित होते. पुढील कारवाई खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com