Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेरील ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा सुटणार; १० लेनचा सुपरहायवे होणार, नेमका प्लान काय?

What is the MSRDC plan for Expressway expansion : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आता १० लेनचा सुपरहायवे होणार आहे. सध्या ६ लेनचा असलेला हा ९६ किमी लांबीचा द्रुतगती मार्ग दररोज सुमारे ६५,००० वाहने झेलतो. विकेंडला ही संख्या दुप्पट होते.
Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expressway to be transformed into a 10-lane superhighway – MSRDC’s ambitious plan to end traffic jams is finally in motion.Google
Published On

When will the Mumbai-Pune Expressway become 10-lane : मुंबई आणि पुण्याला जोडणारा ९६ किलोमीटरचा एक्स्प्रेस वे १० लेनचा सुपरहायवे होणार आहे. या महामार्गावर सोमवार ते शुक्रवार या दरम्यान दररोज अंदाजे ६५००० हजार वाहने जातात. विकेंडला एक्स्प्रेस वेवरील वाहनांची संख्या जवळपास दुपटीनं वाढते, त्यामुळे लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषत: खंडाळा घाट ते खालापूर यादरम्यान वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील लेन वाढण्याची योजना तयार केली आहे.

मुंबई-पुणे हा एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) सध्या ६ लेनचा आहे. एमएसआरडीसीने हा मार्ग १० लेनचा सुपरहायवे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मुंबई ते पुणे यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दिवसरात्र या महामार्गावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. MSRDC ने मुंबई-पुणे महामार्ग १० लेनचा करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे. त्यामुळे लवकरच हा द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त होणार असून, मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

Mumbai-Pune Expressway
Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर किती टोल भरावा लागतो?

मायानगरी मुंबई आणि पुणे ही दोन शहरं एक्स्प्रेस वे आणखी जवळ आली. दररोज या महामार्गावर ६५ हजार ते एक लाख वाहने जातात. महामार्गावर प्रत्येकवर्षी वाहतुकीच्या प्रमाणात ५-६% वाढ होत आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव तयार केला आहे. एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, 'नुकत्याच झालेल्या पावसाळी तयारी आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर योजना सादर करण्यात आली आहे. हा विस्तार भविष्यातील वाहतूक गरजा पूर्ण करेल आणि कोंडी लक्षणीयरीत्या कमी करेल.'

Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुढची ५ वर्षे टोलवाढ नाही, कारण काय ?

मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास सध्या दोन तासांमध्ये पूर्ण होतो. पण शनिवार-रविवारी आणि सुट्टीच्या काळात वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास एका ते तोन तासाने वाढतो. एमएसआरडीसीच्या मते, महामार्ग १० लेनचा झाल्यास हा अतिरिक्त प्रवासाचा वेळ कमी होऊ शकतो. विकेंडच्या वेळीही प्रवास करताना अतिरिक्त वेळ लागणार नाही. १० लेनचा महामार्ग करण्यासाठी अंदाजित खर्च १४,९०० कोटी रुपये इतका लागू शकतो. अतिप्रमाणात खर्च होत असल्यामुळे सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलद्वारे महामार्गाचा विस्तार केला जाऊ शकतो.

Mumbai-Pune Expressway
Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झीट मार्ग ६ महिन्यासाठी बंद; या पर्यायी मार्गाचा करावा लागणार वापर

Mumbai Pune expressway missing link project update

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा नवी मुंबईतील कळंबोली येथून सुरू होतो आणि पुण्याजवळील किवळे येथे संपतो. ९६ किलोमीटरचा हा देशातील पहिला महामार्ग आहे. २००२ हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला झाला होता. सध्या या महामार्गावर १३ किलोमीटरच्या “मिसिंग लिंक” प्रकल्पाचे काम सुरू आहे. या मिसिंग लिंकमुळे खंडाळा घाट विभागात १४ मार्गिका उपलब्ध होतील.

Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expressway : देशातील पहिला एक्सप्रेस वे महाराष्ट्रात, महागड्या 'एक्स्प्रेस वे वर टोल किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com