Siddhi Hande
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मुलांची गावी जाण्यासाठी तयारी सुरु झाली आहे.
जर तुम्ही मुंबई पुणे महामार्गावरुन प्रवास करणार असाल तर तुम्हाला किती टोल भरावा लागणार ते जाणून घ्या.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दोन टोल नाके आहेत. खालापूर टोल नाका आणि तळेगाव टोल नाका.
या दोन्ही टोल नाक्यावर कारला एका बाजूच्या फेरीसाठी २३० ते ३४५ रुपये टोल मोजावा लागतो.
खालापूर टोलनाक्यावर एका प्रवासासाठी हलक्या वाहनांना २३० रुपये तर परत प्रवासासाठी ३४५ रुपये टोल मोजावा लागतो.
एलसीव्ही वाहनांना एका दिशेने ३६५ तर परत प्रवासासाठी ५४५ रुपये मोजावे लागतात.
बस किंवा ट्रकसाठी परतीच्या प्रवासासाठी ११५० रुपये टोल भरावा लागतो.
तळेगाव टोलनाक्यावर मोटार कारसाठी एका दिशेसाठी ३२० रुपये टोल भरावा लागतो.
सर्वसाधारणपणे तुम्हाला एका दिशेच्या प्रवासासाठी ३२० रुपये टोल भरावा लागतो. हे दर बदलत असतात.