Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबचलांब रांगा, नागरिकांचा खोळंबा

Mumbai Pune Expressway Traffic Jam: पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे.
Mumbai Pune Expressway
Mumbai Pune ExpresswaySaam TV
Published On: 

सचिन कदम

Bhor Ghat News : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर सातत्याने अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. अशात आता येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. वाहने अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहेत. (Traffic Jam)

बोरघाट वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. खंडाळा घाटात मुंबई लेनवर अधून मधून १० मिनिटांचा ब्लॉक घेवून पुण्याकडे जाणारी वाहने मुंबईलेनवरून सोडण्यात येत आहेत.

Mumbai Pune Expressway
UP Crime News: नात्याला काळीमा! बापाकडून अल्पवयीन मुलीवर गेल्या ८ महिन्यापासून अत्याचार, घटनेने परिसर हादरला

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; तब्बल ११ गाड्या एकमेकांवर आदळल्या

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. अशात २७ एप्रिल रोजी येथे अपघाताची मोठी घटना घडली होती. तब्बल ७ वाहनांची एकमेकांना धडक बसली. महामार्गावरील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला होता. ज्यामध्ये एक ट्रक, स्विफ्ट, इर्टिगा अशी सात वाहने एकमेकांवर आदळली. या अपघाताची माहिती मिळताच मदत कार्याला सुरूवात केली होती. या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले. तसेच या अपघातात गाड्यांचेही मोठे नुकसान झाले होते.

Mumbai Pune Expressway
Uttar Pradesh Crime : बाप झाला हैवान! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्या तोंडात केमिकल ओतलं, गळा दाबला अन्...; पोटच्या मुलीसोबत असं का केलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.