Mumbai Potholes: रस्त्यांची चाळण अन् नाहक बळी, जबाबदार कोण? मुंबई उच्च न्यायालयाचे ६ महापालिका आयुक्तांना समन्स

Bombay High Court News: सहा महापालिका आयुक्तांना शुक्रवारी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Mumbai Potholes
Mumbai PotholesSaam TV
Published On

सचिन गाड

Mumbai News: मुंबईत पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झालेली दिसते. रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आतापर्यंत खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशात आता याच खड्ड्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सहा महापालिका आयुक्तांना समन्स बजावले आहेत. (High Court summons six municipal commissioners)

याबाबत अधिक माहिती अशी की, रस्त्यांची दुरवस्था आणि उघड्या मॅनहोल्सबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सहा महापालिका आयुक्तांना समन्स बजावले आहेत. सहा महापालिका आयुक्तांना शुक्रवारी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Mumbai Potholes
Mumbai Crime News: बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण? आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

बीएमसी आयुक्तांसह कल्याण डोंबिवली, मीरा भयंदर, वसई विरार,नवी मुंबई आणि ठाणे महापालिका आयुक्तांना तसेच एमएमआरडीएच्या सचिवांनासुद्धा कोर्टात हजर राहण्यास निर्देश देण्यात आलेत.

मुंबईसह आसपासच्या परिसरातील रस्त्यांवरचे खड्डे आणि उघडी मैनहोल्स यासंदर्भात रूजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात याची दाखल केली आहे. दाखल केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने आयुक्तांना समन्स बजावले आहेत.

Mumbai Potholes
Dombivali Crime News: डोंबिवलीत आठ लाखांचे दागिने लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत खड्ड्यातून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात दुंपरची धडक लागून झालेल्या ३२ वर्षीय दुचाकीस्वाराच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेशही यावेळी न्यायालयाने दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com