Mumbai Police Transfer: मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mumbai: पोलीस दलातील १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्या व्यतिरिक्त १ सहाय्यक पोलीस आयुक्त व ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुंबई पोलीस दलात करण्यात आल्या आहेत.
Mumbai Police Transfer
Mumbai Police TransferSaam TV
Published On

सुरज सावंत

Mumbai Police:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा एकूण १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Mumbai Police Transfer
Mumbai Police Recruitment: मुंबई पोलिसांची 12899 पदे रिक्त, कोणत्या पदासाठी किती जागा मंजूर? जाणून घ्या

अधिक माहिती अशी की, पोलीस दलातील १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्या व्यतिरिक्त १ सहाय्यक पोलीस आयुक्त व ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुंबई पोलीस दलात करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करावे असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकांऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर याआधी १६ जानेवारीला पुणे पोलीस आयुक्तालयातील २३ पोलीस निरीक्षक, १९ सहायक निरीक्षक आणि ७६ उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २१ जानेवारी रोजी धुळे जिल्ह्यातील ५ निरीक्षकांसह ४ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात अलीकडेच जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या २ पोलीस निरीक्षकांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली.

Mumbai Police Transfer
Beed Crime News: अंबाजोगाईत महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग ; रोडरोमियोने बळजबरीनं कॉफी शॉपमध्ये नेत काढली छेड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com