T20 World Cup : सेमीफायनल सामन्यांत लाखोंचा सट्टा; मुंबई पोलिसांकडून दोन बुकींना अटक

ऑस्ट्रेलियात सध्या टी २० विश्वचषकाचा थरार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सट्टेबाजांनी धुमाकूळ घातला आहे.
Cricket Betting
Cricket BettingSaam TV
Published On

मुंबई : ऑस्ट्रेलियात सध्या टी २० विश्वचषकाचा (T20 world cup)  थरार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सट्टेबाजांनी धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तान न्यूझिलंड, आणि भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या सेमीफायनल सामन्यांत भारतातून कोट्यावधींचा सट्टा लागल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी टाकत सट्टेबाजांना ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सट्टेबाजांवर मोठी कारवाई केली आहे. (Mumbai Latest News Today)

Cricket Betting
JNU News : जेएनयूमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी, काही विद्यार्थी जखमी

विश्वचषक सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोन सट्टेबाजांना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. मुंबईत कांदिवली येथील इमारतीत सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दहिसर येथील पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला टाकत दोन जणांना अटक केली आहे.

संजय चंदनानी(२५) व मुकेश बिनवानी(४१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. अटक करण्यात आलेले दोघेही कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज येथील रहिवासी आहेत. दोघेही मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत.

आरोपींकडून लॅपटॉप, मेमरी कार्ड, २१ मोबाईल जप्त करण्यात आले असून संकेतस्थळ मालकाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय आरोपींकडील ४३ ग्राहकांची यादीही पोलिसांना मिळाली आहे. दोन मुख्यआरोपींसह ४३ ग्राहकांनाही याप्रकरणी आरोपी करण्यता आले आहे.

कांदिवली येथील इमारतीत सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दहिसर येथील पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला. याप्रकरणाचे धागेदोरे मध्यप्रदेशापर्यंत जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com