Mumbai Police : मुंबईला कसला धोका?, पोलिसांकडून तात्काळ ऑर्डर; १५ दिवस ५ पेक्षा जास्त लोक जमू नका!

मुंबई पोलिसांचे डीसीपी ऑपरेशन संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
Shivsena Dasara Melava Mumbai Police
Shivsena Dasara Melava Mumbai PoliceSaam TV

मुंबई : मुंबईत (Mumbai)असामाजिक तत्व मुंबईत कोणतेही अनुचित कृत्य करण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 1 नोव्हेबंर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई पोलिस त्यांच्यावर कलम 188 अन्वये कारवाई करणार आहेत. मुंबई पोलिसांचे डीसीपी ऑपरेशन संजय लाटकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.

मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, मुंबईतील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांना वेगवेगळ्या स्त्रोतांकडून मिळाली आहे. याशिवाय मानवी जीवित व मालमत्तेचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे मुंबईत दंगल घडू नये आणि सार्वजनिक वित्तहानी किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा हा आदेश 1 नोव्हेंबर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत लागू राहणार आहे. (Latest News)

Shivsena Dasara Melava Mumbai Police
Invest In MP: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पुण्यात येणार; राज्यातील प्रकल्प पुन्हा परराज्यात जाणार?

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क आहेत. सार्वजनिक ठिकाणे, न्यायालये, सरकारी कार्यालये यांच्या सुस्पष्ट भागांमध्ये त्याच्या प्रती चिकटवून आणि लाऊडस्पीकर किंवा मेगाफोनच्या माध्यमातून तसेच उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्वरूपात प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिध्द करून प्रकाशित केला जाईल.

Shivsena Dasara Melava Mumbai Police
Pune Traffic Jam Video: पुणे - सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; अंबादास दानवेंनाही बदलावा लागला मार्ग

पाच किंवा अधिक व्यक्तीच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीची मिरवणूक काढता येणार नाही. कोणत्याही मिरवणुकीत लाउडस्पीकर, वाद्य आणि फटाके फोडण्यास मनाई असेल.

सर्व प्रकारचे विवाह समारंभ, अंत्यसंस्कार सभा, स्मशानभूमी, दफन स्थळांच्या मार्गावरील मिरवणूक यांना यातून सूट देण्यात आली आहे. तसेच कंपन्या, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका यांनाही यातून सूट देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com