Mumbai : मुंबईत बांगलादेशी घुसखोरांवर धडक कारवाई, २० जणांना रात्रीत बेड्या, वाचा

Mumbai crime news : मुंबईच्या वर्सोवा परिसरात पोलिसांनी विशेष मोहिम राबवत २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांची ओळख आणि नेटवर्क तपास सुरू आहे.
Mumbai police detain Bangladeshi nationals Versova
Mumbai police detain Bangladeshi nationals Versova Saam
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Mumbai police detain Bangladeshi nationals Versova : मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. अंधेरी वेस्ट येथील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहिम राबवून 20 हून अधिक बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती भारतात वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई अचूक गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. अँटी टेररिझम सेल (ATC) पथकाने लक्षित ऑपरेशन राबवत पुरुष आणि महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर अवैधरित्या भारतात प्रवेश करून दीर्घकाळ लपून राहिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Mumbai police detain Bangladeshi nationals Versova
Maharashtra Crime : उरणमध्ये खळबळ! भाजप आमदाराच्या बंगल्यात कोयता घेऊन तरूण घुसला अन्...

ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटवण्याची सखोल प्रक्रिया सुरू असून ते कोणत्या नेटवर्कच्या माध्यमातून भारतात आले, तसेच बनावट कागदपत्रांचा वापर झाला का याचा तपास सुरू आहे. दरम्यान, 8 फेब्रुवारी रोजी मलाड ईस्टमधील पठाणवाडी परिसरातूनही चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांनी चौकशीदरम्यान बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai police detain Bangladeshi nationals Versova
Horoscope Today : व्हॅलेंटाईन डेला ५ राशींवर होणार पैशांचा वर्षाव; तुमच्या नशिबात काय आहे? जाणून घ्या एका क्लिकवर!

प्राथमिक तपासात काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असून त्यावरून त्यांच्या बांगलादेशाशी संबंधांची पुष्टी होत आहे. संबंधितांना कायदेशीर प्रक्रियेनंतर डिपोर्ट करण्याची कारवाई सुरू असून आवश्यक निर्बंध आदेश मिळवण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जात आहे. मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, शहराच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि अवैध परदेशी नागरिकांविरोधातील ही विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार आहे

Mumbai police detain Bangladeshi nationals Versova
Accident : हायवेवर मृत्यूचं तांडव! ३ वाहनांचा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, चालक अन् ६ बारावीच्या मुलांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com