Mumbai: प्रभादेवीमधून उबेर बुक केली, चालकानं कार थेट निर्जनस्थळी नेली, मुलीचा विनयभंग अन्...

Mumbai Police Uber Driver: मुंबईत एका उबेर चालकाने अल्पवयीन १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Crime News
Crime News Latest NewsSAAM TV
Published On

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. उबेर चालकाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी चालकाने दिलेल्या पत्त्यावर न जाता कार थेट इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर निर्जनस्थळी नेली. नंतर मुलीसोबत गैरवर्तन करत तिची छेड काढली, असा आरोप मुलीने केला. या प्रकरणी उबेर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडीत मुलगी १४ वर्षांची असून, मंगळवारी ४:३० च्या दरम्यान ही घटना घडली. मुलीने दादर प्रभादेवी परिसरातून आपल्या घरी जाण्यासाठी उबेर अॅपद्वारे कॅब बुक केली होती. मात्र, चालकाने दिलेल्या पत्त्यावर न जाता कार दुसऱ्या ठिकाणी वळवली. उबेर चालकाने कार थेट इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर निर्जनस्थळी नेली.

Crime News
'आपकी बात मान लेंगे', तडीपार अमित शहांची बाळासाहेबांना विनंती, मातोश्रीवर एका फोनमुळे नेमकं काय घडलं?

यानंतर चालकाने उबेर चालकाने मुलीसोबत गैरवर्तन करत तिची छेड काढली. घाबरलेल्या मुलीने थेट घर गाठले आणि कुटुंबाला सगळी हकिकत सांगितली. या प्रकाराची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी दादर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी उबेर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

Crime News
Tuljapur: जेवला अन् झोपला, रात्रभर वेदनेनं विव्हळत; एकुलत्या एक मुलाचा झोपेतच हार्ट ॲटॅकनं मृत्यू

तक्रारीवरून पोलिसांनी उबेर चालकाविरोधात भारतीय दंड संहिता 2023 मधील कलम 75, 79 आणि पोक्सो कायद्यातील कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दादर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी चालकाचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News
Sanjay Raut: 'टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा अन् गावागावात यात्रा काढा', महायुती सरकारवर राऊत बरसले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com