सावधान! अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देताय? थेट वडिलांवरच गुन्हा दाखल, मुंबईतील प्रकरणामुळे खळबळ

Mumbai minor driving case : मुंबईच्या वांद्रे परिसरात १७ वर्षीय मुलाला विनापरवाना स्कूटर चालवण्यास दिल्याप्रकरणी वडिलांविरोधात FIR दाखल करण्यात आली. पोलिसांनी स्कूटर जप्त करून कायदेशीर कारवाई केली.
Bandra police action against underage scooter riding in Mumbai
Father Booked in Mumbai Minor Driving Case Saam TV (AI image)
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai father booked for allowing minor son to drive : मुंबईतील वांद्रे परिसरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी दिल्यामुळे वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. वाहन चालवण्याचा परवाना (Driving Licence) नसताना आणि कायदेशीर वय पूर्ण नसताना वांद्रेच्या रस्त्यावर सुसाट स्कूटी चालवणाऱ्या एका १७ वर्षीय मुलावर कारवाई करत वांद्रे पोलिसांनी त्याच्या वडिलांविरोधात थेट एफआयआर (FIR) दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलांचे वाढते रस्ते अपघात आणि रहदारीच्या नियमांचे होणारे सर्रास उल्लंघन रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. या घटनेत १७ वर्षांचा मुलगा विनापरवाना स्कूटी चालवताना आढळल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गाडी जप्त केली. मोटर वाहन कायद्यानुसार (Motor Vehicles Act) अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास देणे हा गंभीर गुन्हा असल्याने, निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी पोलिसांकडून थेट मुलाच्या पालकांवरच ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

वांद्रे पश्चिम येथील हिल रोड परिसरात १९ ऑगस्ट रोजी झालेल्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी कारवाई केली. परवाना नसतानाही १७ वर्षीय मुलाला स्कूटर चालवण्यास दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित १७ वर्षीय मुलगा ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी त्याला वाहन चालवताना अडवले. चौकशी केली असता त्याच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नसल्याचे समोर आले. तसेच रज्जा अब्दुल रहमान शेख (वय ४५, व्यवसाय: चालक) या आपल्या वडिलांनीच स्कूटर आणि तिची चावी आपल्याला दिल्याचा खुलासा मुलाने चौकशीदरम्यान केला.

Bandra police action against underage scooter riding in Mumbai
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट, ४८ तासांत खात्यात जमा होणार ३००० रुपये? मोठी अपडेट समोर

कारवाई होण्यापूर्वी मुलाने जवळपास ९ किलोमीटर स्कूटर चालवली होती, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून, मुलाच्या आधारकार्डाची पडताळणी केल्यानंतर तो अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मीनाकुमारी शितोळे यांनी तक्रार दाखल केली आहे. पुढील चौकशीत ही स्कूटर अजाज अझीझ अहमद खान यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. त्यांनी ती आपले मेव्हणे (बहिणीचे पती) शेख यांना वापरण्यासाठी दिली होती, असे पोलिसांना सांगितले.

Bandra police action against underage scooter riding in Mumbai
कॅबिनेट मंत्राचा OSD आमदार होणार? उदय सामंतांचा विश्वासू शिलेदार विधान परिषदेच्या रिंगणात

परवाना नसताना अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवण्यास देणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. अशा प्रकरणात वाहन मालक किंवा पालकांवर कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते. दोष सिद्ध झाल्यास पालक किंवा वाहन मालकाला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच संबंधित अल्पवयीन मुलाला वयाच्या २५ वर्षांपर्यंत शिकाऊ (Learning) किंवा कायमस्वरूपी (Permanent) वाहनचालक परवाना मिळण्यावरही निर्बंध येऊ शकतात.

या प्रकरणात वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र त्यानंतर नोटीस बजावून त्यांची सुटका करण्यात आली. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देताना पालकांनी अधिक दक्षता आणि काळजी घ्यावी, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com