Atal Setu Bridge: 'अटल सेतू'वर सेल्फी काढणं पडलं महागात; २६४ वाहनचालकांना मुंबई पोलिसांचा दणका

Atal Setu Mumbai Bridge: 'अटल सेतू'वर विनाकारण वाहने थांबवून सेल्फी घेणाऱ्या २६४ बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Atal Setu Mumbai Bridge
Atal Setu Mumbai BridgeSaam TV
Published On

Atal Setu Bridge Police Action

मुंबईला नवी मुंबईसोबत जोडणारा ‘अटल सेतू’ शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या सागरी मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला. पहिल्या दोन दिवसांतच पुलावरून लाखो वाहने धावली. मात्र, हा सागरी सेतू पाहण्यासाठी अनेकजण वाहने थांबवून गर्दी करत आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Atal Setu Mumbai Bridge
Weather Forecast: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' भागात कोसळणार अवकाळी पाऊस; IMD कडून महत्वाचे अपडेट

'अटल सेतू'वर विनाकारण वाहने थांबवून सेल्फी घेणाऱ्या २६४ बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना देखील पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ‘अटल सेतू’चे उद्‍घाटन करण्यात आले. हा सेतू शनिवारपासून वाहनचालकासाठी खुला करण्यात आला. मात्र, पहिल्याच दिवशी वाहनचालकांमध्ये या पुलाबद्दल प्रचंड उत्साह होता. शनिवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे बहुतांश प्रवाशांनी हा मार्ग पाहण्यासाठी येथून प्रवास केला.

यावेळी अनेक वाहनचालक आणि प्रवाशांनी पुलावर थांबून सेल्फी घेत नयनरम्य दृश्‍य आपल्या कॅमेऱ्यात टिपले. मात्र यावेळी सागरी सेतूवर विनाकारण थांबणे अनेक वाहनचालकांना महागात पडले असून २५० वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

मोटर वाहन कायदा कलम १२२ व १७७ कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वाहनचालकांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, 'अटल सेतू'वर विनाकारण वाहने थांबवून वाहनचालकांनी स्वत:चा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Atal Setu Mumbai Bridge
Rashi Bhavishya: नोकरीचा योग येईल, आर्थिक उलाढालीत यश मिळेल; ५ राशींचं बदलणार भाग्य

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com