चीनचा गुप्तहेर असल्याचा संशयातून एका कबूतराला ८ महिने तुरुंगात राहावे लागले आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर कबूतराची तुरुंगात सुटका झालीय. हेरगिरीच्या आरोपाखील कबूतराला पकडल्यानंतर त्याला प्राण्यांच्या रुग्णालयातील कोठडीत ठेवण्यात आले होते. परळ भागातील प्राण्यांसाठी असलेल्या बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटलने सोमवारी पक्षी सोडण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलीय. (Latest News)
गेल्या वर्षी मे महिन्यात चेंबूरच्या उपनगरातील पीर पौळ जेट्टीवर आरसीएफ पोलिसांनी या कबुतराला (Pigeon) पकडले होतं. पक्ष्याच्या पायात दोन कड्या बांधल्या होत्या. कबूतराच्या दोन्ही पंखाखाली चिनी भाषेत काही संदेश लिहिलेले होते. या गोष्टींवरुन कबतूर चीनसाठी (China) हेरगिरी करत असल्याचा संशय बळावला. त्यानंतर आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपास पूर्ण झाल्यानंतर कबूतरावरून हेरगिरीचा (spying) आरोप वगळण्यात आलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना कळले की, कबूतर तैवानमध्ये ओपन वॉटर रेसिंगमध्ये भाग घेत असे. अशाच एका कार्यक्रमानंतर तो भारतात आला होता. पोलिसांनी कबुतराच्या सुटकेसाठी 'ना हरकत' दिल्यानंतर रुग्णालयाने कबुतराची सुटका केल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पक्षी पूर्णपणे ठीक असून त्याची त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आलीय.
मार्च महिन्यात ओडिशातील मासेमारी करणाऱ्यांकडे हेर कबुतराला पकडण्यात आले होते. आहे. ओडिशातील पारादीप सागरी पोलिसांनी पुरी जिल्ह्यात फिशिंग ट्रॉलरमधून हेर कबुतराला (Spy Pigeon) पकडले होते. पुरी जिल्ह्यातील कोणार्क भागातील रामचंडी येथे ६ मार्च रोजी दुपारी सारथी नावाच्या ट्रॉलरमधून मच्छीमारांनी या कबुतराला पकडले होते. या 'विंग्ड इंटेलिजेंस एजंट'ला एक लहान स्पाय कॅमेरा आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम असल्याचे सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.