Mumbai : पार्किंग दाखवा, गाडी घ्या ? राज्यात लवकरच नवा कायदा?

Maharashtra's Upcoming Law: पार्किंगचं बंधन घालायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारा असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारला लगावलाय.
car purchase, parking law
car purchase, parking law
Published On

Maharashtra's Upcoming Law: आता बातमी नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी....नवीन कार खरेदी करताना आपण संपूर्ण प्लॅनिंग करतो. यात बजेट, इंजिन, फीचर्स, स्टाइल आणि कारच्या कलर्सपासून ते अनेक गोष्टींचा आपण विचार करतो. मात्र, आता या सर्व गोष्टींसोबतच आणखी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागणार आहे, ती म्हणजे पार्किंगसाठीची जागा

अन्न,वस्त्र,निवारा या मुलभूत गरजांसह साधारणतः दशकभराआधी मध्यम वर्गालाही चारचाकी आपल्या दारात हवीच ही गरज जाणवू लागली.त्यातून सहज वाहन कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या बँकांमुळे झटपट लोन आणि पटपट कार खरेदीची चढाओढ सुरु झाल्याचं आजही दिसतं...मात्र त्यातून आता निर्माण झालीये ती पार्किंगची समस्या. गाड्या जास्त अन् मर्यादीत पार्किंग आणि त्यातून सोसायट्यांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या,भांडणं ही मेट्रो शहरातील जटील समस्या बनत चाललीये...म्हणूनच तुम्ही गाडी घेत असाल आणि तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल तर तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न भंगलंच म्हणून समजा. कारण सरकार अशा लोकांनाच गाडी विकत घेऊ देणार ज्यांच्याकडे पार्किंगसाठी जागा आहे.

नव्या वर्षातील आकडेवारीनुसार आपल्या मुंबईत किती वाहनं आहेत याचा आकडा पाहीला तर तो थक्क करणारा आहे...

मुंबईत वाहनांची संख्या किती ?

मुंबईत एकूण 48 -49 लाख वाहनं

खासगी चारचाकी - 14 लाख

खासगी दुचाकी - 29 लाख

इतर वाहनं - 5 लाख

एकीकडे एवढ्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि वाहतूक कोंडी होणं हे नित्याचच झालंय..बरं हा प्रश्न फक्त मुंबईतच नव्हे तर पुणे आणि नागपूरमध्येही मोठ्या प्रमाणात भेडसावतोय. हीच समस्या दूर करण्यासाठी आता सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्यात नेमक्या काय तरतुदी असणार ते पाहूयात..

कसा असणार पार्किंगचा नवा कायदा?

- वाहतूक विभागाकडून कायद्याचा मसूदा तयार

- पार्किंग असेल तरच गाडी विकत घेता येणार

- सरकार सर्टिफाईड पार्किंग एरीया नावाची नवीन व्यवस्था आणणार

- ग्राहक नवीन गाडी घेणार तेव्हा ग्राहकाला हे सर्टिफिकेट मिळवणं बंधनकारक

- महानगरपालिका वाहनमालकांना प्रमाणपत्र देणार

- वाहतूक पोलिसांकडून प्रमाणपत्राची पडताळणी होणार

पार्किंगचं बंधन घालायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारा असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारला लगावलाय.

मुंबईत सामान्यांना पार्किंगसह पुरेशी मोठी घरं मिळावी यासाठी सरकार बिल्डर्सना जादाचा एफएसआय देत असते. मात्र सुपर बिल्टअपच्या नावाखाली बिल्डर कार्पेट एरियात सर्सार ग्राहकांची फसवणूक करून पार्किंगच्या जागांमधूनही २०-२५ लाख रुपये जादाचे कमवतात. त्यामुळे गाडीपेक्षा पार्किंग महाग अशी अवस्था मुंबई-पुण्य़ात झालीय. त्यामुळे पार्किंगच्या जागांबाबत गंडा घालणाऱ्या बिल्डर्सनाही चाप लावण्याची गरज यानिमित्तानं व्यक्त होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com