Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

82 Children Missing from Mumbai : मुंबईत 36 दिवसात 82 मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे पालकाचं टेन्शन चांगलच वाढलयं.नेमकं प्रकरण काय आहे? मुंबईतून मुलांना कोण गायब करतयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
82 Children Missing from Mumbai
Mumbai records 82 missing children in 36 days; rising cases spark concern among parents and police.saam tv
Published On
Summary
  • मुलांच्या गायब होण्यामागे ट्रॅफिकिंग रॅकेटची शक्यता

  • मुंबईत 36 दिवसांत तब्बल 82 मुलं बेपत्ता झाल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण.

  • वाढत्या घटनांमुळे मुंबईत चाइल्ड सेफ्टी अलर्ट जारी करण्याची मागणी वाढतेय.

पालकानों, तुम्ही हातातलं काम सोडा, , टिव्हीचा आवाज वाढवा आणि ही बातमी नीट लक्ष देऊन ऐका. ज्या मुलांच्या उज्वल आयुष्यासाठी तुम्ही आयुष्यभर खस्ता खाता त्याच मुलांचं आयुष्य धोक्यात आलंय. तुमच्या मुलांवर कुणातरी दुष्टांची नजर आहे. होय तुम्ही जे ऐकताय. जे पाहताय ते 100 % खरंय. तुमची मुलं धोक्याच्या उंबरठ्यावर उभीयेत. अजूनही विश्वास बसत नसेल तर ही आकडेवारी लक्षपुर्वक पाहा.

36 दिवसांत 82 मुलं गायब, 60 मुलींचा समावेश

जून ते डिसेंबर 134 मुलं गायब, एकुण 86 मुलींचा समावेश

महिना संख्या मुलगा/ मुली

जून 26 0/ 26

जुलै 25 15/25

ऑगस्ट 19 5/14

सप्टेंबर 21 6/15

ऑक्टोबर 19 12/7

नोव्हेंबर 24 9/15

डिसेंबर 11 5/8

पायाखालची वाळू सरकेल अशी ही धक्कादायक आकडेवारी मुंबईतील गायब मुलांची आहे. हि तीच मुंबई आहे जे 24/7 धावतं शहर आहे हे तेच शहर आहे जे सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं हे तेच शहर आहे जे देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे हे आकडे झोप उडवणारे नक्कीच आहेत. दिवसाला २ किंवा ३ मुलं गायब होत असतील तर आपल्या मुल किती असुरक्षित आहेत याचा अंदाज तुम्हाला आला असेल पण याही परिस्थितीत काही मुलांना शोधण्यात पोलिसांनी यश आल्याचा दावा करण्यात आलाय.

गायब मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिस आता सखोल चौकशी करतायेत. मुंबईभर सीसीटिव्ही लावून देखिल मुलं मुली सर्रास गायब होत असतील तर मात्र हे एक मोठं आव्हान पोलिसांपुढे नक्कीच आहे. खरे आकडे जास्त असू शकतात कारण काही पालक समाजातील बदनामीच्या भितीनं मुलं गायब झाल्याची प्रकरणं पोलिसांत नोंदवत नाहीत. मात्र यामुळे कोवळ्या जिवांचे काय हाल होतात हे आपल्याला श्रद्धा वालकर प्रकरणानंतर कळलंच होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com