Mumbai News: २२ वर्षीय तरुणाने व्हिडीओ पोस्ट करत संपलं जीवन, शिवसेना नेत्यांच्या भावावर आरोप; मुंबईत खळबळ

Youth End Life After Post Video On Instagram: चंद्रेश तिवारी असं या तरुणाचे नाव आहेत. त्याने आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या भावाचे नाव घेतले आहे.
Mumbai News: २२ वर्षीय तरुणाने व्हिडीओ पोस्ट करत संपलं जीवन, शिवसेना नेत्यांच्या भावावर आरोप; मुंबईत खळबळ
Youth End Life After Post Video On InstagramSaam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई

राज्यात सगळीकडे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. अशातच मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या मालाडमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत या तरुणाने आत्महत्या केली. चंद्रेश तिवारी असं या तरुणाचे नाव आहेत. त्याने आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या भावाचे नाव घेतले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमध्ये राहणाऱ्या चंद्रेश तिवारी या तरुणाने इन्स्टाग्रामवर रील शेअर करत आत्महत्या केली. चंद्रेश याने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तीन व्यक्तींची नावं घेतली आहेत. यात दीपक विश्वकर्मा, परेश शेट्टी आणि सदानंद कदम यांच्या नावाचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे सदानंद कदम हॅथवे केबलचे मालक असून ते शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ आहेत. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत अधिकचा तपास सुरू केला आहे.

Mumbai News: २२ वर्षीय तरुणाने व्हिडीओ पोस्ट करत संपलं जीवन, शिवसेना नेत्यांच्या भावावर आरोप; मुंबईत खळबळ
Mumbai Fire : ऐन दिवाळीत मुंबईत भीषण आग, कशामुळे उसळला आगडोंब? VIDEO

चंद्रेश तिवारीच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्याचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी यावर कमेंट्स करत आहेत. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे भाऊ असल्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग दिला जात आहे. चंद्रेश तिवारीच्या आत्महत्या प्रकरणात त्याने नावं घेतलेल्या तिघांचा नेमका काय संबंध आहे. या बाजूने पोलिस तपास करत आहेत. या तिघांचे जबाब नोंदवून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.

Mumbai News: २२ वर्षीय तरुणाने व्हिडीओ पोस्ट करत संपलं जीवन, शिवसेना नेत्यांच्या भावावर आरोप; मुंबईत खळबळ
Mumbai News : मुंबईतून 9 कोटींचे डॉलर्स जप्त, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com