Breaking News : मुंबईत चालत्या दुचाकीने घेतला अचानक पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबईच्या दहीसरमध्ये चालत्या दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे.
mumbai news
mumbai news saam tv

संजय गडदे

Mumbai Bike Fire : मुंबईच्या (Mumbai) दहीसरमध्ये चालत्या दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे. रात्री उशिरा रस्त्यावरून जाताना दुचाकीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली. सुदैवानी या घटनेत कोणतीही जीविततहानी झाली नाही.

mumbai news
'उद्धव ठाकरेंकडे चांगली वाक्य नसतील तर...', चित्ता सरकारवरून नारायण राणेंची टीका

मुंबई उपनगरातील दहीसर पश्चिमेकडील कांदरपाडा परिसरामध्ये दुचाकीला आग लागल्याची सदर घटना घडली. रात्री उशिरा डी मार्ट समोरून जाणाऱ्या दुचाकीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या घटनेमुळे रस्त्यावर एकच खळबळ उडाली. आग लागल्यानंतर नागरिकांनी दुचाकीला लागलेली आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अनेकांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्यामुळे दुचाकीस्वार घाबरला. तसेच शिवाय आजूबाजूला असलेले नागरिकही भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले.

mumbai news
पेंग्विन सेना म्हणणाऱ्यांना आम्ही चित्ता पार्टी म्हणायचं का? वरुण सरदेसाईंचा भाजपला टोला

आग दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली

दुचाकीने पेट घेतल्याचे समजताच दुचाकीस्वाराने त्याची दुचाकी रस्त्यावर फेकून देऊन बाजूला पळ काढला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी दुचाकी जळून खाक झाली आहे. . दुचाकीला आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशामक यंत्राचा वापर करून दुचाकीला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवले. घटना रात्री घडल्याने रस्त्यावर वाहनांचे प्रमाण कमी होते. आग लागल्यानंतर घटनास्थळी काही प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशात दुचाकी पेट घेण्याच्या घटना वाढल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com