
भूषण शिंदे
Narayan Rane News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारतात नामिुबियावरून चित्ते आणण्यात आले. हे चित्ते मोदी सरकारने कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले आहे. हेच चित्ते भारतात आणण्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचा उल्लेख 'चित्ता सरकार' करत टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. 'उद्धव ठाकरे यांच्याकडे चांगली वाक्य नसतील, तर त्यांनी मला फोन करावा. त्यांना चांगलं बोलताच येत नाही, अशी टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्याकडे चांगली वाक्य नसतील, तर त्यांनी मला फोन करावा, त्यांना चांगलं बोलताच येत नाही. माझ्याकडे चांगली वाक्य आहेत. चांगल्या गोष्टींचं कौतुक करावं'.
दसरा मेळाव्याबाबत नारायण राणे म्हणाले, शिंदे गटालाच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळेल. धनुष्यबाणही शिंदेंकडेच राहणार. कोर्टातून दसरा मेळाव्यावर निकाल लागेल'. तसेच नाणार प्रकल्पावरही नारायण राणे यांनी भाष्य केलं. नाणार होणारच. कोकणातच होणार. कोणाचाही विरोध चालू देणार नाही. नाणार प्रकल्प हातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मी स्वत: मंत्री आणि कंपनीशी, अधिकाऱ्यांशी बोललो आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीवर देखील नारायण राणे यांनी भाष्य केलं. '२०२४ साली भाजपचे ४०३ खासदार असतील. गोवा आणि दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार असेल. शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपच्या मंत्र्यांचे चांगले दौरे सुरु आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व मुख्यमंत्रिपद सोडलं तेव्हाच संपलं. उद्धव ठाकरे हे देशात आणि राज्यात कुठेही नाहीत. फक्त मातोश्रीच्या कक्षेत त्यांचे अस्तित्व आहे'.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.