Dombivli News : रूग्णाला सीटीस्कॅन करायला सांगितल्याने नातेवाइक संतापले; डॉक्टरला मारहाण, चावा घेतला, CCTV

Patient Relative Attack On Doctor: डोंबिवली स्टार कॉलनी परिसरातील आरोग्यम रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्यम रुग्णालयात डॉक्टरसह कर्मचाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करत चावा घेतला आहे.
Dombivli News
Aarogyam Hospital Saam Tv

अभिजीत देशमुख साम टीव्ही, मु्ंबई

डोंबिवली स्टार कॉलनी परिसरातील (Dombivli News) आरोग्यम रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्यम रुग्णालयात डॉक्टरसह कर्मचाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करत चावा घेतला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रुग्णाला सीटीस्कॅन करायला सांगितल्याच्या कारणावरून वाद झाला होता. ही हाणामारीची घटना सीसीटीव्ही (Patient Relative Attack On Doctor) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.

हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकानी मारहाण करत चावा घेतल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टार कॉलनी परिसरातील आरोग्य हॉस्पिटलमध्ये ही घटना (Attack On Doctor) घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे .

डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी परिसरात आरोग्यम हॉस्पिटल आहे. 20 तारखेच्या संध्याकाळी डोंबिवलीत राहणारे राज सिंह आपली पत्नी ज्योतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. ज्योती सिंह हिला पोटात (Aarogyam Hospital in Dombivli) त्रास होत होता. सोबत राजची आई देखील होती. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ज्योतीवर उपचार केले. थोड्यावेळानंतर ज्योतीचा त्रास कमी झाला.

डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज करायचे (Aarogyam Hospital) सांगितले. डिस्चार्ज करताना ज्योतीला परत पोटात त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी ज्योतीला अॅडमिट व्हायच्या सल्ला दिला. डॉक्टरांनी ज्योतीला सिटीस्कॅन आणि इतर बाबी करायला सांगितलं. हे ऐकून ज्योतीचे नातेवाईक संतापले. ज्योतीचे पती राज सिंह आणि सासू सुशीला सिंह या दोघांनी डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली होती.

Dombivli News
Sydney Attack : ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील मॉलमध्ये दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता, परिसरात खळबळ

वादाचं रूपांतरण हारामारीत झालं. यादरम्यान राज आणि सुशीला या दोघांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर नितीन खोटे आणि इतर दोन कर्मचाऱ्यांच्या चावा घेतला. हा धक्कादायक प्रकार (CCTV Footage) घडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी ज्योतीचे पती राजसिंग आणि राज याची आई सुशीला विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

Dombivli News
Israel Attack On Iran: मोठी बातमी! इस्रायलचा इराणवर हल्ला; क्षेपणास्त्र डागल्याचा दावा, अनेक शहरं हादरली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com