Sydney Attack : ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील मॉलमध्ये दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता, परिसरात खळबळ

Sydney Attack Latest News : ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे.
Sydney Attack
Sydney Attack Saam tv

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या शॉपिंग सेंटरमध्ये घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडनीच्या शॉपिंग सेंटरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार आणि चाकू हल्ला करत अनेकांची हत्या केली आहे. या घटनेने मॉलमध्ये एकच खळबळ उडाली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर लोक मॉलमध्ये भीतीने पळू लागले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मॉलमधील हजारो लोकांची सुटका केली.

Sydney Attack
Israel Hamas War: इराण- इस्रायलमध्ये तणाव; दोन्ही देशांचा प्रवास टाळा... भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा सल्ला

न्यू साऊथ वेल्स राज्य पोलिसांनी सांगितलं की, आम्ही संपूर्ण मॉलला घेरलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये लोक जीव वाचविण्यासाठी पळताना दिसत आहे. तसेच पोलिसांचे वाहन देखील दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. त्यातील एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.

Sydney Attack
Maldives : बहिष्कारामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला फटका; आता भारतीयांना पर्यटनासाठी आकर्षित करण्यासाठी भारतात करणार रोड शो

रिपोर्टनुसार, सिडनी पोलिसांच्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांवर हल्ला करण्यसाठी या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं म्हटलं आहे. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, त्यांनी सुरुवातीला गोळीबाराचा आवाज ऐकला. त्यानंतर पळू लागले.

शॉपिंग सेंटरमध्ये होती ग्राहकांची गर्दी

न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी सांगितलं की, 'दहशतवाद्यांचा हल्ला वेस्टफील्ड बॉडी जंक्शन मॉल परिसरात ही घटना घडली. शनिवारी दुपारी खरेदीसाठी शॉपिंग सेंटरमध्ये एकच गर्दी केली होती. मात्र, या घटनेनंतर मॉल काही काळासाठी बंद केलं आहे. या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या दहशतवाद्याची मागणी काय होती, ते कुठून आले होते, याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com