Mumbai News: मढ परिसरात असलेल्या अनधिकृत स्टुडिओवर (Madh Illegal Studio) सध्या कारवाई सुरु आहे. या अनधिकृत स्टुडिओचा मुद्दा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उचलून धरला होता. काँग्रेसचे माजी मंत्री असलम शेख (Aslam Shaikh) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कृपेने मालाडच्या मढमध्ये हे स्टुडिओ उभारण्यात आले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर आजपासून 1000 कोटींचे डजनभर अनधिकृत स्टुडिओ तोडण्याचे काम सुरु झाले आहे. ही कारवाई पाहण्यासाठी किरीट सोमय्या हातात प्रतिकात्मक हातोडा आणि फावडा घेऊन पोहचलेत.
काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख सध्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आहेत. २०२१ मध्ये अस्लम शेख यांनी मढ मार्वे परिसरात अनधिकृत स्टुडिओ बांधण्यास परवानगी दिल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. त्यांच्या पत्राची दखल घेत आता मढ परिसरातील अनधिकृत स्टुडिओवर कारवाई केली जात आहे. नॅशनल ग्रीन त्रिबूनलने हे स्टुडिओ पाडण्याचे आदेश दिलेत.
किरीट सोमय्या हे सध्या मढ परिसरातील एरंगळ गावातील अनधिकृतपणे उभारलेल्या बालाजी स्टुडिओच्या कारवाईची पाहणी करण्यासाठी पोहचले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते देखील आहेत. हातामध्ये प्रतिकात्मक हतोडा, कुदळ आणि फावडा घेऊन ते याठिकाणी दाखल झालेत. यावेळी किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 'ठाकरे सरकारच्या काळात माफीयांचे राज्य होते. अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या कृपेने २०२१ साली डझनभर अनधिकृत स्टुडिओ मढमध्ये उभारण्यात आले. 25 आणि 50 हजार स्व्केअर फूटच्या स्टुडिओंना आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयाने परवानगी दिली होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेने 'आओ जाओ राज तुम्हारा' फक्त 'मातोश्री'वर हिशोब द्या आणि जे करायचे ते करा असं चालवलं होतं.', अशी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.
तसंच, 'आजपासून स्टुडिओ पाडण्याचं काम सुरु होणार असून, 'मोदी है तो मुमकीन है'. आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघांनी मिळून स्टुडिओला परवानगी दिली होती. त्यामुळे अस्लम शेख काँग्रेसचा हात आणि वांद्र्याची नोट मोजण्याची मशीन आहे.' अशी टीका किरीट सोमय्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.