Pune Political News : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरुन भाजपामध्येच रस्सीखेच? तीन नेत्यांची नावे चर्चेत

Pune News : पोटनिवडणुकीसाठी आता इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.
Girish Bapat Passed Away
Girish Bapat Passed AwaySaam Tv
Published On

सचिन जाधव

Pune News : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होईल. गिरीश बापट यांच्यानंतर भाजप याठिकाणी कुणावर विश्वास दाखवणार हा प्रश्न आहे. मात्र पोटनिवडणुकीसाठी आता इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. भाजपची ही हक्काची जागा असल्याचं मानलं जातं. म्हणूनच या जागेवर आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरु झाली आहे.

भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे या तीन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीकडूनही काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Pune News)

Girish Bapat Passed Away
Pune News : फोन उचलण्याची घाई जीवावर बेतली; पुण्यातील 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून बॅनर शहरात लागले होते. त्यामुळे मुळीक यांचं नावही याठिकाणी लोकसभेसाठी चर्चेत आलं होतं. गिरीश बापट यांच्या निधनानंतर काही दिवसातचं लागलेल्या या बॅनरवरुन विरोधकांनी जगदीश मुळीक यांच्यावर निशाणा देखील साधला होता. (Political News)

Girish Bapat Passed Away
Pune Political News : प्रेमभंग झाल्याने दर्दी आशिक भडकला; बड्या नेत्यांना धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात

एकीकडे भाजपमधून अनेक नावांची चर्चा सुरु आहेत. मात्र भाजप गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिक आहे. महाविकास आघाडी देखील जनभावनेच मान राखत निवडणूक बिनविरोध करु शकते. मात्र निवडणूक झाली तर कुणाचं पारडं जड ठरेल हे येणार काळच ठरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com