Mumbai News : मुंबईत डिलिव्हरी बॉयला अटक; महिलेने पोलिसांना सांंगितला थरारक अनुभव

आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
Arrest
ArrestSaam Tv
Published On

मुंबई : मुंबईतील खार परिसरात कोरियन यूट्युब ब्लॉगर तरुणीची दोन टवाळखोरांकडून छेडछाड करत विनयभंग केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. ही संतापजनक घटना ताजी असताना खार परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Mumbai News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजादे शेख नावाचा डिलिव्हरी बॉयने पार्सल देताना महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. डिलिव्हरी बॉयच्या या कृत्याचा महिलेने विरोध केला. मात्र यानंतर आरोपीने पीडितेच्या घरात घुसून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. (Crime News)

Arrest
Korean Vlogger Harassed: कोरियन तरुणीचा भररस्त्यात विनयभंग करणाऱ्या दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी डिलिव्हरी बॉयविरोधात कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Arrest
Mumbai News: खळबळजनक! मुंबईत १३ वर्षीय मुलीवर शाळकरी मुलांकडून सामूहिक बलात्कार

पीडित महिलेने घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं की, मी पार्सल घेण्यासाठी गेली त्यावेळी डिलिव्हरी बॉयने अचानक व्हिडिओ सुरु केला. मी याला विरोध केला. मात्र त्याने घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ केली. मी लगेच आरडाओरड सुरु केला. त्यामुळे माझा आवाज ऐकून इमारतीचे सुरक्षारक्षक माझ्या मदतीला आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com