Mumbai Mobile Phone Theft News : सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींकडून तब्बल 7 लाख किंमतीचे मोबाईल जप्त

या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत 7 लाख 54 हजार इतकी असल्याचे समजते.
Mumbai Mobile Phone Theft
Mumbai Mobile Phone Theft Saam TV

संजय गडदे

Mumbai Crime News: मुंबईत प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत मोबाईलवर डल्ला मारणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच सराईत मोबाईल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष बाराला यश मिळाले आहे. पोलिसांनी या टोळीकडून 68 मोबाईलसह गुन्ह्यासाठी वापरलेली एक रिक्षा देखील जप्त केली आहे. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत 7 लाख 54 हजार इतकी असल्याचे समजते. (Crime News)

इम्रान मोहम्मद अलीम खान (२२ वर्षे), महेंद्र रमेश झाजरे (३४ वर्षे) मोहम्मद अली आझाल खान (५२वर्षे ) शकील अहमद मोहम्मद सादीक अन्सारी (५९ वर्षे) आसिफ मुबारक शेख (३१ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

Mumbai Mobile Phone Theft
Pune Crime News : वाहतूक पोलिसाचं लाजिरवाणं कृत्य; भररस्त्यात नागरिक भयभीत

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव मुलुंड लिंक रोड वरील बस स्टॉपवर मोबाईल चोरांची टोळी गर्दीतील नागरिकांचे मोबाईल चोरी करण्यासाठी साडेचार वाजता एकत्र जमणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 12 येथील पोलिसांना मिळाली. यानुसार अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक तयार करून बस स्टॉप परिसरात सापळा लावला या दरम्यान तीन व्यक्ती बसमध्ये चढणाऱ्या व्यक्तींचे खिसे चाचपडत असल्याचे व त्या तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या तिघांना हटकले मात्र ते बस स्टॉपवर असलेल्या रिक्षातून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी त्यांना गुन्हे शाखा कक्ष पथकाने ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे 12 अँड्रॉइड फोन आढळून आले.

त्यांच्यावर मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करून तपास करण्यात आला. चोरीचे मोबाईल आरोपींकडून मुबारक शेख यास विकले जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याला देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडे देखील वेगवेगळ्या कंपन्यांचे अँड्रॉइड फोन आय फोन तसेच इतरही महागडे फोन आढळून आलेत.

Mumbai Mobile Phone Theft
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : परीक्षेत एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; खळबळजनक घटनेनं शिक्षकही हादरले

अशा प्रकारे सर्व आरोपींकडून एकूण 68 महागडे फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या सर्व आरोपींविरोधात मुंबईच्या (Mumbai) वनराई गोरेगाव दिंडोशी डी एन नगर आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या सर्व आरोपींना 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com