Mumbai Metro-3 Trial Run: मुंबई मेट्रो ३ ची पहिली ट्रायल रन यशस्वी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टोलेबाजी

Mumbai Metro 3 Trial Run Successful: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.
Mumbai Metro 3 Trial Run Successful
Mumbai Metro 3 Trial Run SuccessfulTwitter/@@MumbaiMetro3
Published On

मुंबई: मुंबईतील भूमिगत मेट्रो असलेल्या मेट्रो ३ ची (Mumbai Metro) आज पहिली चाचणी घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ डब्यांच्या प्रोटोटाइप ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ट्रायल रनला सुरुवात केली. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो या मार्गांवरुन ही मेट्रो ३ धावणार आहे. सध्या फक्त ३३.५ किलोमीटरची ट्रायल रन होणार आहे. यात एकूण २७ स्थानके असतील, त्यापैकी फक्त एकच जमिनीच्यावर असेल, बाकी सर्व स्टेशन जमिनीखाली (Underground Metro) असतील. या मार्गामुळे दक्षिण मुंबईतील कुलाबा महानगराच्या पश्चिम उपनगरांशी जोडला जाईल. यामध्ये दररोज १७ लाख लोक प्रवास करतील असा अंदाज आहे. या ट्रेनची काही चाचणी आंध्र प्रदेशातील श्री शहरातही करण्यात आली होती. (Mumbai Metro 3 News)

हे देखील पाहा -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले की, "विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही." तसेच त्यांनी मेट्रो ३ च्या कामाला शुभेच्छा दिल्या. ते मंगळवारी (३० ऑगस्ट) कुलाबा-वांद्रे-सिप्स मेट्रो लाइन-३ च्या प्रोटोटाईप ट्रेन चाचणी शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, "आज आपण पाहतो आहे की तो संपूर्ण महामार्ग पूर्णत्वास जातोय. आपण लवकरच नागपूर ते शिर्डी या महामार्गाचं उद्घाटन करतो आहे. असे अनेक प्रकल्प सुरू केले. मात्र, त्यात अनेक विघ्नं आली. उद्या विघ्नहर्ता गणरायाचं आगमन होत आहे. अश्विनी भिडेंनी बरोबर योग साधून आज हिरवा झेंडा दाखवला. विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही."

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात राज्यातील नवीन सरकारला आरेमध्ये कारशेड बांधण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. 'मुंबईच्या हृदयावर वार करू नका' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडला विरोध केला.

Mumbai Metro 3 Trial Run Successful
Online Sex Racket : कॉल सेंटरमधून काळेधंदे; ऑनलाईन सेक्स रॅकेटचा भंडाफोड, १७ महिलांची सुटका

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, राजकीय वादामुळे मेट्रो 3 च्या चाचणीला उशीर झाला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारामुळे मेट्रो धावल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर पुढील चार वर्षातही ही ट्रेन धावू शकली नसती. वीस हजार कोटींची गुंतवणूक वाया गेली असती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मेट्रोचा प्रवास सारीपूत नगर ते मरोळ नाका असा असेल, ज्यामध्ये ८ डब्यांची प्रोटोटाइप ट्रेन SIPZ MIDC आणि मरोळ नाक्यापर्यंत धावेल. १२ किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत, दुसरा टप्पा म्हणजे संपूर्ण मार्ग जून २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com