मुंबई: ऑनलाईन सेक्स रॅकेट (Online Sex Racket) चालवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई क्राइम ब्रँच युनिट ११ ने एका ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Cyber Crime) करत १७ महिलांची सुटका केली. या प्रकरणी कॉल सेंटरच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांकडून ऑनलाईन सेक्स चॅट आणि व्हिडिओ चॅट केले जात होते. (Online Sex Racket)
हे देखील पाहा -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी ऑनलाईन सेक्स रॅकेटसाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन घेतला होता. या आरोपीने एक अॅप्लिकेशन तयार केले होते, ज्याद्वारे तो ग्राहकांना संपर्क साधायचा. त्यानंतर कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलांशी कॉल जोडायचा आणि नंतर कॉलरच्या (ग्राहकाच्या) मागणीनुसार फोन कॉल सेक्स किंवा व्हिडिओ सेक्स चॅट करण्यासाठी या महिलांना सांगायचा. या सेक्स चॅटची सुरुवात २७० रुपयांपासून होत होती आणि १० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. या प्रकरणात आरोपींनी सेक्सटोर्शनही (Sextortion) केले होते का? याबाबत गुन्हे शाखा तपास करत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये काही सुशिक्षित मुलींचाही सहभाग आहे. पैशांसाठी आरोपी त्यांना हे काम करायला लावत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे गुन्हेगारी कृत्यासाठी केला जातोय हे समोर आले आहे. दरम्यान सेक्सटॉर्शन (Sextortion) या नवीन प्रकारामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कारण व्हिडीओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून फसवणूक होऊन ते व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.