Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

mumbai fight video viral news : मुंबईच्या मालाडमधील बारमधील कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला गंभीर मारहाण केली. पोलिसांसमोरच तरुणाला केलेल्या मारहाणीचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बारच्या वॉचमेनशी वाद; कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोरच तरुणाला बेदम मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद
Malad Crime Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या एका बारमधील कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारमधील कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला मारहाण केली आहे. मुंबईतील मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या कर्मचाऱ्यांनी तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मुंबईच्या मालाड येथील चिंचोली बंदर येथील जश्न बारमधील कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला गंभीर मारहाण केली. मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 सप्टेंबर रोजी मारहाणीची घटना घडली. बारमधील कर्मचाऱ्यांनी तरुणाला गंभीर मारहाण केल्यानंतर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांसमोर मारहाण झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

बारच्या वॉचमेनशी वाद; कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोरच तरुणाला बेदम मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद
Mumbai Crime: मुंबई हादरली! शेजारी राहणाऱ्या आजोबानेच केला घात, चाकू गळ्यावर ठेवत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नेमकं काय घडलं ?

मालाडमधील जश्न बारमध्ये एक तरुण दारु प्यायला. दारू हा तरुण दोन वेळा बारमधून बाहेर आला. त्यानंतर तिसऱ्यांदा बारमध्ये शिरण्यास वॉचमनने रोखल्यामुळे वाद झाला. त्यानंतर मद्यधुंद तरुणाने बाईकवरील हेल्मेटने वॉचमनला मारहाण केली. या हेल्मेटच्या मारहाणीत वॉचमन गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याच्या बारमधील इतर कर्मचाऱ्यांनी मद्यधुंद तरुणाला गंभीर मारहाण केली.

तब्बल चार ते पाच कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोरच तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. मारहाणीच्या घटनेनंतर शिवप्रकाश नाडर आणि वॉचमन राम झा या दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १८ सप्टेंबर रोजी बारमधील कर्मचाऱ्यांनी तरुणाला मारहाण केली होती. त्यानंतर आज या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बारच्या वॉचमेनशी वाद; कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोरच तरुणाला बेदम मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद
Viral News : आनंदी वातावरण क्षणात बदललं दु:खात; पदर जनरेटरमध्ये अडकून महिलेसोबत घडली भयंकर घटना

पोलिसांचा वचक आहे की नाही?

मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली मारहाणीची घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालाडमधील बारमधील चार ते पाच कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोरच तरुणाला मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोरच तरुणा मारहाण झाल्याने पोलिसांचा वचक नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com