Mumbai News : धक्कादायक! नोकरानेच दिली महंताची हत्या करण्याची सुपारी; मालाड पूर्वेतील खळबळजनक घटना

Mumbai Crime News : मुंबईच्या मालाड पूर्वेकडील पठाणवाडी येथील प्रसिद्ध महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी ( वय 67) यांच्यावर 23 जुलै रोजी खुनी हल्ला झाला
Mumbai Malad Crime News
Mumbai Malad Crime NewsSaam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या मालाड पूर्वेकडील पठाणवाडी येथील प्रसिद्ध महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी ( वय 67) यांच्यावर 23 जुलै रोजी खुनी हल्ला झाला. या हल्ल्यातील हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याप्रकरणी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

Mumbai Malad Crime News
Mumbai Crime News: धक्कादायक! किशोर पेडणेकरची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या, घरात बायको मृतावस्थेत आढळली

मिळालेल्या माहितीनुसार, कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पठाणवाडी येथे प्रसिद्ध संकट मोचक विजय हनुमान मंदिर आणि गोशाळा देखील आहे. या मंदिरात महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी हे वास्तव्यास होते. मंदिर आणि गोशाळा याची देखभाल करण्यासाठी त्यांनी काही सेवेकरी आणि नोकर देखील नेमले होते. यातील एक नोकर सूर्यनारायण दास हा महंत माधवाचार्याची यांच्या विश्वासातील होता.

मात्र, सूर्यनारायण दास हा गोशाळेतील दूध लपून विक्री करायचा. याबाबत संशय आल्याने महंत माधवाचार्याजी यांनी त्याला कामावरून काढून टाकले. यावरून सूर्यनारायण दास याला राग अनावर झाला. मी तुम्हाला दोन महिन्याच्या आतच संपवून टाकेन, अशी धमकी देऊ तो निघून गेला.

23 जुलैच्या पहाटे महंत ध्यानस्थ बसले असताना एक अज्ञात तरुण त्यांच्या पूजा घरात घुसून त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात महंत माधवाचार्याची जखमी झाले. महंताचा ओरडण्याचा आवाज ऐकून इतर नोकर पळत आले. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याप्रकरणी मंदिरातील काही नोकरांनी कुरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दिली.

झोन 12 च्या डीसीपी स्मिता पाटील आणि कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तैनात केली. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेश येथे असल्याचे समजताच पोलिसांनी हल्लेखोराला मध्य प्रदेश येथून अटक केली.

हल्लेखोराकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, हा हल्ला करण्यासाठी मंदिरातील नोकर सूर्यनारायण दास याने आपल्याला सुपारी दिल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी सूर्यनारायणदास याला देखील अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोन्हीही आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai Malad Crime News
Mumbai Crime: मोबाइल चोरला, त्यात नवरा-बायकोचे प्रायव्हेट व्हिडीओ सापडले, मग सुरु झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com