मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने एका १४ वर्षीय मुलीने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना मुंबईतील मालाड परिसरात मंगळवारी (ता. २६) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी मालवणी येथील खारोडी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. वयाच्या १४ व्या वर्षी तिला पहिल्यांदा मासिक पाळी (Period Pain) आली होती. या पाळीचा तिला भयंकर त्रास होत होता. त्यामुळे ती मानसिक तणावात होती.
याच नैराश्यातून मुलीने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घरात कुणी नसताना गळफास घेतला. दरम्यान, हा प्रकार तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. स्थानिकांनी तातडीने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलीला उपचारासाठी कांदिवलीतील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. मृत मुलीला नुकतीच पहिली मासिक पाळी आली होती. त्यामुळे ती अस्वस्थ होऊन तणावाखाली गेली. यातूनच तिने कदाचित आपले जीवन संपवले असावे, असा जबाब तिच्या पालकांनी पोलिसांत (Police) दिला.
दुसरीकडे पोलिसांनी देखील घटनेची चौकशी केली असता, त्यांना या प्रकरणात कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, मासिक पाळीच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या एनजीओ म्युज फाऊंडेशनचे निशांत बंगेरा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. मुलींसाठी मासिक पाळीबद्दलचे शिक्षण खूप महत्वाचे असल्याचं बंगेरा म्हणाले.
ग्रामीण भागासह मोठ्या शहरांमध्येही अनेक मुलींना मासिक पाळीबाबत फारशी माहिती नसते. मुलींच्या कुटुंबातील सदस्यही या गोष्टीला हलक्यातच घेतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शन आणि जागृकतेची गरज असते, असं देखील निशांत बंगेरा यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.