Mumbai Fire : मुंबईत इमारतीला भीषण आग; ६ जण होरपळले

Mumbai Fire update : मुंबईतील घाटकोपरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत ६ जण होरपळल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai news
Mumbai Ghatkopar fire Saam tv
Published On
Summary

मुंबईत आग लागण्याच्या घटना सुरुच

धारावीनंतर मुंबईतील घाटकोपरमधील इमारतीला आग

आगीत ६ जण होरपळले

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईत आग लागण्याची मालिका सुरुच आहे. धारावीनंतरआज मुंबईतील घाटकोपरमधील इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीला लागलेल्या आगीत ६ जण होरपळल्याची माहिती मिळाली आहे. या आगीतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Mumbai news
लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या घाटकोपर पूर्वेकडील ९० फिट रोडवरील साई नगरमध्ये असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे इमारतीला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इमारतीला लागलेल्या आगीत सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या जखमींमध्ये महिलांचाही समावेश आहे.

Mumbai news
Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

इमारतीला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या व्यक्तींचे नावे समोर आलं आहे. प्रतिक कुमार मुखिया, गौरी मुखिया, प्रशांत विश्वकर्मा, पूजा मुखिया, दलत देवी मुखिया, नागेश्वर मुखिया हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. रुग्णालयात दाखल केलेले जखमींची प्रकृती स्थिर आहे. काही जण इमारतीला लागलेल्या आगीत अधिक प्रमाणात भाजले गेले आहेत. तर काही जण १० ते १२ टक्के भाजले आहेत.

Mumbai news
लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

रत्नागिरीत कंपनीला भीषण आग

रत्नागिरीतील चिपळूण खेर्डी MIDC मधील थ्री एम पेपर मिल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप घेतलं. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात कागदाचा साठा असल्याने आगीची व्याप्ती वाढली. मागील अर्ध्या तासांपेक्षा जास्त काळ आग सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिपळूण नगर पालिकेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com